पहिल्या दिवशी ढगांचा अडथळा
By Admin | Updated: November 10, 2014 00:44 IST2014-11-10T00:33:51+5:302014-11-10T00:44:05+5:30
किरणोत्सव : मुख्य गाभाऱ्यापर्यंत सूर्यकिरणे

पहिल्या दिवशी ढगांचा अडथळा
कोल्हापूर : ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सवाच्या आज, रविवारी पहिल्या दिवशी अंबाबाईच्या मुख्य गाभाऱ्यातील गर्भगृहातील संगमरवरी दुसऱ्या पायरीपर्यंत सूर्यकिरणे पोहोचली. दुसऱ्या पायरीनंतर सूर्यकिरणे वर सरकत लुप्त झाली. पहिल्या दिवशी चरणस्पर्श न झाल्याने भाविक नाराज झाले.
किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळपासून वातावरण स्वच्छ असल्याने पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होईल, असे वाटत होते. मात्र, सायंकाळी साडेपाच वाजता किरणोत्सवाच्या मार्गावर ढग आले, किरणांची तीव्रता कमी झाली.
सायंकाळी ५.२० मिनिटानंतर सूर्यकिरणे मंदिरात येऊ लागली. सूर्यकिरणे सरकू लागली. त्यानंतर ढगाळ वातावरणाने किरणांची तीव्रता कमी झाली. गर्भगृहातील संगमरवरी दुसऱ्या पायरीपर्यंत किरणे पोहोचली. त्यानंतर किरणे वर जात लुप्त झाली. पंचवीस मिनिटे हा किरणोत्सव सुरू होता. उद्या, सोमवारेही किरणोत्सव होणार आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात रविवारी पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील गर्भगृहातील दुसऱ्या संगमरवरी पायरीपर्यंत सूर्यकिरणे पोहोचली.