कापड व्यापारी प्रकाश पोरे यांचे अपघाती निधन
By Admin | Updated: June 8, 2014 01:18 IST2014-06-08T01:18:20+5:302014-06-08T01:18:35+5:30
सांगोल्याजवळ कारला अपघात; अन्य दोघे जखमी

कापड व्यापारी प्रकाश पोरे यांचे अपघाती निधन
कोल्हापूर : येथील प्रसिद्ध कापड व्यापारी व पोरे मेडिकल्सचे मालक प्रकाश पोरे (वय ५२) यांचे कार अपघातामध्ये आज, शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सांगोल्याजवळ निधन झाले. उद्या, रविवारी त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येणार असून, सकाळी
८ वाजता त्यांच्या ताराबाई पार्क येथील निवासस्थानातूून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाद्वार रोडवरील जुने ‘पोरे ब्रदर्स’ या प्रसिद्ध कापड दुकानाचे मालक प्रकाश पोरे हे आपल्या दुकानातील चार कर्मचाऱ्यांसह होंडा सिटी कारमधून आज अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सांगोल्याजवळ त्यांच्या कारला समोरून येणाऱ्या इनोव्हा कारने धडक दिली. या अपघातात पोरे ठार झाले तर त्यांच्यासोबत असणारे दोघे कर्मचारीही यामध्ये जखमी झाले, त्यांच्या मृतदेहाचे मिरज येथील एका रुग्णालयात रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा होता. (प्रतिनिधी)ं