शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या हद्दवाढीविरोधात येत्या गुरुवारी १८ गावांत बंद, सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी समितीचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 15:20 IST

पालकमंत्र्यांना नैतिक अधिकार आहे का ?

कणेरी: कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीविरोधात १८ गावांच्या ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. १२) गाव बंद ठेवून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा एकमुखी निर्धार केला. उजळाईवाडी येथे झालेल्या बैठकीत १८ गावच्या पदाधिकाऱ्यांनी हद्दवाढविरोधात लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला.उजळाईवाडी (ता. करवीर) येथील समर्थ मंगल कार्यालय येथे सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी समितीच्या वतीने १८ गावांतील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये हद्दवाढीतील प्रस्तावित गावे शिरोली, नागाव, वळीवडे, गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, उंचगाव, कळंबे तर्फे ठाणे, नवे बालिंगे, वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे, शिंगणापूर, नागदेववाडी, शिरोली औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत या गावांतील सरपंच, पदाधिकारी, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती. उजळाईवाडीचे सरपंच उत्तम बांबवडे यांनी प्रास्ताविकेत संभाव्य हद्दवाढीचे भूत आपल्या मानगुटीवर घोंघावत असून, अठरा गावांतील नागरिकांचा विरोध शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी सामूहिक विरोधाची मोट बांधली पाहिजे, असे सांगितले.मुडशिंगीचे तानाजी पाटील म्हणाले, हद्दवाढ विरोधासाठी कमिटी स्थापन करून यामार्फत जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन विशेष ग्रामसभेमध्ये हद्दवाढीला विरोध दर्शवला पाहिजे. यावेळी उजळाईवाडीच्या उपसरपंच मेघा गुमाणे, गोकुळ शिरगावचे पी. एस. मगदूम, रघुनाथ कांबळे, उचगावचे महालिंग स्वामी, महेश चौगुले, किरण कुसाळे, आदींनी हद्दवाढीला विरोध दर्शवला.यावेळी गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, सदस्य रणजित पाटील, शामराव पाटील, संतोष गवळी, संदीप पाटील, टी. के. पाटील, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, जि. प. सदस्य महेश चौगुले, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले, सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी आडसूळ, वडणगेच्या सरपंच संगीता पाटील, मुडशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे, कळंबा सरपंच सुमन गुरव, शिंगणापूरच्या सरपंच रसिका पाटील, पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील, वाडीपीर सरपंच संदीप मिठारी, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, आदींसह १८ गावांतील पदाधिकारी उपस्थित होते. आभार किरण आडसूळ (सरनोबतवाडी) यांनी मानले.पालकमंत्र्यांना नैतिक अधिकार आहे का ?कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले हसन मुश्रीफ हे आपल्या कागल तालु्क्यातील सुळकूड योजनेतून इचलकरंजी महापालिकेला पाणी देत नाहीत. मात्र, १८ गावांचे मत विचारत न घेता, हद्दवाढीत गावांचा समावेश करणार असे म्हणतात. याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का?, असा सवाल यावेळी सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी समितीच्या वतीने करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर