शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

खंजिरांच्या खणखणाटात घड्याळाचाच गजर...

By admin | Updated: February 21, 2017 23:31 IST

पाठीत वार करणाऱ्यांचे हात अखेर तोकडे : ‘कोल्हापुरी दादांं’च्या कार्यकर्त्यांची धावही कुंपणापर्यंतच; ‘पक्षनिष्ठेच्या बाता’ मारणाऱ्यांची ‘व्यक्त्तीपूजा’ अखेर उघड

सातारनामा

 

सचिन जवळकोटे

 

हुश्शऽऽ अखेर एकदाचं मतदान झालं. आता ‘विधानसभेची नांदी’ गुरुवारी समजणार. कुणाचा ‘निकाल’ लागला अन् कुणाचं घोडं झेडपीच्या गंगेत न्हालं, हे त्यादिवशीच कळून चुकणार.. परंतु मतदारांचा कल मंगळवारीच अनेकांच्या लक्षात आलाय. काळाचा ट्रेन्डही स्पष्ट झालाय. होय.. खंजिरांच्या खणखणाटातही घड्याळाचाच पुन्हा गजर झालाय. ‘कोल्हापुरी दादां’नी जिल्ह््यात मारलेली उडी धाडसाची ठरली असली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांची धाव मात्र कुंपणापर्यंतच पोहोचलीय. नेमका कुणाचा ‘हात हातात’ घ्यावा, याचा ठाम निर्णय न घेता आल्यानं ‘बाबा-नानां’ची टीमही केवळ डझनाच्या आसपासच घुटमळलीय. ‘थोरल्या राजें’ची शिट्टी शहराच्या आसपासच वाजली गेलीय तर मोजक्या अपक्षांना अन् आघाडी बहाद्दरांना आपली थोडीफार ताकद दाखवता आलीय. ‘कमळाबाई’नं वाजविली ‘शिट्टी’! सातारा पालिकेच्या गल्ली-बोळात वाजणाऱ्या ‘शिट्टी’चा आवाज तालुक्याच्या शिवारात मात्र म्हणावा तसा घुमलाच नाही. ‘हातात कमळ’ घेऊन ‘शिट्टी’ वाजवायला निघालेल्या ‘थोरल्या राजें’ना ग्रामीण भागातील ‘सहकारी संस्कृती’चं वास्तव स्वीकारावंच लागणार, असं दिसतंय. कारण ‘ज्याच्या हाती बँक, दूध अन् सोसायट्या.. तोच ग्रामीण भागाचा खरा नेता.’ हे सूत्र ‘धाकट्या राजें’नी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. मात्र ‘थोरल्या राजें’नी घुसळलेल्या राड्यात पद्धतशीरपणे ‘कमळ’ वाढविण्यात ‘नागठाणे’वाल्यांना यश आल्यानं सातारा तालुक्यात अनेक ठिकाणी ‘घड्याळाचे काटे’ हळू फिरलेत. वर्णेतही ‘कमळाबाई’नं ‘शिट्टी’ वाजविलीय. खरी चुरस मात्र शेंद्रेतच झालीय. आदल्या रात्री ‘संत्रा-मोसंबीचा घमघमाट’ जेवढा शेंद्रेत सुटला होता, त्याहीपेक्षा जास्त ‘विदेशी ब्रॅण्डचा स्मेल’ म्हणे बाकीच्या परिसरात पसरला होता. मात्र, आप्पांचा ‘स्थानिक ज्युस’ दोन्हीकडंही उतारा ठरू शकतोय. ‘जावळीचा वाघ’ कोरेगावात शांत! कुडाळच्या खोऱ्यात सुरुवातीला ‘कमळाबाई’चाच बोलबाला असताना शेवटच्या दोन दिवसांत ‘जावळीच्या वाघाची डरकाळी’ भलतीच घुमली. ‘भावासाठी कायऽऽपण’ म्हणत ‘शिंदे सरकार’ झपाटल्यागत ठिकठिकाणी जेवढं फिरले, त्याहीपेक्षा जास्त म्हणे ‘मुंबईचे बिल्ले’ गावोगावच्या म्होरक्यापर्यंत पोहोचले. त्यामुळं एका दिवसात वातावरण फिरलं. ‘ऋषि’मुनींच्या नंदनवनात नांदत असल्याचा भास अनेकांना झाला. याचा फायदा ‘महिगावच्या ह.भ.प. नेत्या’ला झाला तर नक्कीच आश्चर्य वाटायला नको. शेजारच्या डोंगरावर ग्रीष्मातही ‘वसंत’ फुलल्याचा संदेश तर अगोदरच सर्वांपर्यंत पोहोचलाय. त्यामुळंच की काय ‘गाड्या फोडाफाडी’च्या राजकारणाला ऊत आलाय. मेढ्यात मात्र साऱ्यांनाच चमत्काराची प्रतीक्षा. इकडं जावळी खोऱ्यात घरातलं ‘बंधूप्रेम’ उफाळून आलं असलं तरी तिकडं कोरेगावात ‘बाहेरचं नेतृत्त्व नको’ची कॅसेट पुन्हा एकदा रिपीट झाल्यानं या ठिकाणी ‘स्थानिक बर्गे अ‍ॅण्ड कंपनी’ जोरातच. पाटणचा ‘उत्कृष्ट राजकारणी’पटू! ‘उत्कृष्ट संसदपटू नेता घरच्या मतदार संघात प्रामाणिक अन् पक्षनिष्ठच असायला हवा, असं नाही!’ याचं जिवंत उदाहरण यंदा पाटणच्या कोयना खोऱ्यात बघायला मिळालं. पक्षाच्या जिल्हाध्यक्षालाच ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ म्हणण्याचं धाडस फक्त इथलाच नेता करू शकतो, याचीही चुणूक म्हणे ‘मातोश्री’वाल्यांना मिळाली. असो. ‘पुरंदरकर’ अन् ‘मरळीकर’ या दोघांमधल्या शीतयुद्धात बिच्चाऱ्या ‘सेनेचा हर्ष’ हरपला तर जास्त आश्चर्य वाटायला नको. बाकी, ‘मोठ्या दादां’च्या तालमीत तयार होणाऱ्या ‘छोट्या दादां’चं स्पीच म्हणे यंदाच्या प्रचारात चांगलंंच ‘सकस’ झालंय. याचा फायदा त्यांना आगामी विधानसभेला होऊ शकतो. झेडपीत यंदा अडीच डझनाचा पल्ला गाठण्यात यशस्वी ठरू पाहणाऱ्या घड्याळाला सगळ्यात मोठी चावी देण्याचं काम ‘मकरंद आबां’नीच केलंय, हे मात्र निश्चित. वाई विधानसभा मतदार संघात अर्ध्या डझनापेक्षाही जास्त मेंबर दणदणीत मतानं निवडून आणण्याचा चमत्कार आबांच्या नावावर जमा होईल, तेव्हा जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘पाटील गट’ एकदम स्ट्रॉँग होऊन मुसंडी मारेल, यात शंकाच नाही. कदाचित ‘झेडपीचा अध्यक्ष कोण ?’ या प्रक्रियेतही आबांचा शब्द निर्णायक ठरेल.. कारण सर्वाधिक मेंबर निवडून आणणारे एकमेव आमदार म्हणून अवघा जिल्हा त्यांच्याकडेच बघेल. पिस्तुलाचा ‘प्रताप’ अंगलट... एकीकडं व्यक्त्तीद्वेषानं झपाटलेले ‘जयाभाव’ अन् ‘फलटणकर’ एकमेकांच्या विजार अन् नाड्यांना हात घालत असताना दुसरीकडं ‘घड्याळाला हृदयाजवळ ठेवण्याचं पुण्यकर्म’ कऱ्हाडच्या ‘बाबा-नाना’ यांच्या छावणीत मनोभावे केलं गेलं. ‘विलासकाका’ पेक्षाही ‘अतुलबाबा’ भविष्यातील सर्वात मोठा शत्रू असल्याचा साक्षात्कार झाल्यामुळंच की काय, ‘बाबांं’नी दिलदार वृत्तीनं ‘अजितदादां’सारख्या शत्रूच्या टीमला जवळ केलं. याचा फायदा कऱ्हाड पट्ट्यात चांगला झाला असला तरी शेवटच्या दिवशी नानांच्या बॉडीगार्डनं दाखविलेला पिस्तुलाचा ‘प्रताप’ पक्षाच्या अंगलट येऊ शकतोय. विशेष म्हणजे, ‘आपला मतदारसंघ म्हणजेच अवघं विश्व’ समजणाऱ्या नानांना जिल्ह्यात फिरायलाही वेळ (!) मिळाला नाही. त्यामुळं यंदा झेडपीच्या निवडणुकीत पक्षाकडून काही अनोखा चमत्कार घडण्याची भाबडी आशा बाळगण्याचा त्रासही त्यांच्या कार्यकर्त्यांनी यंदा घेतला नसावा. बाकी, झेड्पीतील आपला जुना गट आहे तसा ठेवण्यात ‘विलासकाकां’ना थोडंफार यश नक्कीच मिळालंय. फलटणची ‘पक्षनिष्ठा’ अन् खंडाळ्याचं ‘व्यक्तीप्रेम’ ‘झेडपीचा अध्यक्ष फलटणचाच हवा,’ ही रणनीती यशस्वीपणे राबविणाऱ्या ‘राजें’ना यंदाही तालुक्यानं साथ दिलीय. विशेष म्हणजे, गेल्यावेळी ज्या कोरेगाव तालुक्यात ‘पाडापाडी’चं राजकारण जोरात रंगलं होतं, तिथं हेच ‘राजे’ यंदा साऱ्यांना प्रामाणिकपणाचे धडे देत होते. फलटणच्या राजेंनी स्पष्ट केलेली ही पक्षनिष्ठा शेजारच्या खंडाळा तालुक्यात मात्र काहीजणांना रूचली नाही. तिकीट मिळालं नाही म्हणून ‘धाय’मोकलून आसवं गाळणाऱ्यांच्या पाठीवर म्हणे याच ‘राजें’नी गुपचूप हात फिरविल्याचा गवगवाही ‘खेडो’पाडी झाला होता. ( की केला गेला होता ?) कदाचित तिथं चमत्कार घडलाच तर ‘राजे निष्ठा’ जिंकली अन् ‘आबा नीती’ हरली, असंच म्हणावं लागेल. ‘जयाभाव’चा मोबाईल अन् ‘शेखरभाऊं’ची कहाणी माण-खटावच्या दुष्काळी माळरानावर जनतेला भलेही प्यायला पाणी नसेल, मात्र यंदा चघळायला ‘ए’ ग्रेडचा ‘हॉट’ विषय मिळाला होता. ‘जयाभावच्या मोबाईलची कहाणी’ गावोगावी चर्चिली गेली होती. या मुद्द्याचा ‘शेखरभाऊं’नी प्रचारात पुरेपूर वापर केला असला तरी ‘जयाभाव’ही ‘कहाणीमागची कहाणी’ सांगायला पुरून उरले होते. तरीही माणदेशात पाचपैकी तीन ठिकाणी चमत्कार घडण्याची शक्यता अधिक. तसंच, देसार्इंनी पसरलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर यंदा प्रथमच ‘कमळ’ फुलण्याची खात्री असली तरी येळगावकरांचा ‘मायणी बार’ याहीवेळी नुसता ‘आपट बार’च ठरतोय की काय ?