शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आजऱ्यात सहा हजारांची लाच घेताना कारकून जाळ्यात, दोन महिन्यानंतर मिळणार होती बढती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 17:21 IST

मृत्युपत्राप्रमाणे प्रॉपर्टी कार्डवर नाव नोंदणीसाठी घेतली लाच 

आजरा : मृत्युपत्रप्रमाणे प्रॉपर्टी कार्डवर नावनोंदणी करण्यासाठी ६ हजारांची लाच घेताना आजरा भूमी अभिलेख कार्यालयातील निवास वसंत पाटील - निमतानदार ( मोजणी कारकून ), वय ४३, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी, सध्या रा.सामंत काॅम्प्लेक्स गांधीनगर रोड, आजरा ) यास अटक केली आहे. ही कारवाई सायंकाळी ४:३० वा. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आजरा येथे सापळा रचून करण्यात आली.तक्रारदार यांच्या आईचा मामा यांना वारस नसल्याने त्यांनी त्यांची मिळकत मृत्युपत्राद्वारे तक्रारदार यांच्या आई हयात असताना त्यांच्या नावे केली होती. तक्रारदार यांच्या आईच्या मृत्यूनंतर त्यांना मृत्युपत्राद्वारे मिळालेल्या मिळकतीमधील ( चिमणे ता. आजरा ) येथील न. भू. क्र. ३७३ या मिळकतीचे प्रॉपर्टी कार्डला वारसा हक्काने तक्रारदार यांचे वडील व भाऊ यांचे नाव लावण्याकरिता निवास पाटील याने सहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. शुक्रवारी लाच घेत असतानाच त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबतचा गुन्हा आजरा पोलिसात रात्री उशिरा दाखल करण्याचे काम सुरू होते.सदरची कारवाई पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंखे, सहायक फौजदार प्रकाश भंडारे, पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील घोसाळकर, पोलिस नाईक सचिन पाटील, संदीप काशीद यांनी केली आहे.बढतीपूर्वीच लाचलुचपतच्या जाळ्यातनिवास पाटील गेली अनेक वर्षे आजरा भूमी अभिलेख कार्यालयात नोकरीस आहे. त्यास दोन महिन्यानंतर बढती मिळणार होती. मात्र, बढतीपूर्वीच तो लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे.

कारवाईनंतर सर्व कार्यालये क्षणात बंदनिवास पाटील यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याची माहिती तहसील कार्यालयासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व कार्यालयात वाऱ्यासारखी पसरली. आपल्यावर कोणतेही गंडांतर येऊ नये म्हणून सर्वांनी तातडीने आपले कार्यालय बंद करून घरी जाणे पसंत केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग