शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Navratri-नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या पुरातन अलंकारांची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 17:07 IST

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या पुरातन अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. या अलंकारांमध्ये हिरे, माणिक, पाचू अशा नवरत्नांच्या जडावाच्या तसेच शिवकालीन, आदिलशाही व शाहूकालीन अलंकारांचा समावेश आहे.

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या पुरातन अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. या अलंकारांमध्ये हिरे, माणिक, पाचू अशा नवरत्नांच्या जडावाच्या तसेच शिवकालीन, आदिलशाही व शाहूकालीन अलंकारांचा समावेश आहे. नवरात्रौत्सवाच्या तयारीअंतर्गत दरवर्षी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री अंबाबाईच्या दागिन्यांची स्वच्छता केली जाते. पहिल्यांदा सोन्याचे व जडावाचे अलंकार व त्यानंतरच्या दिवशी चांदीचे अलंकार व पूजेच्या साहित्यांची स्वच्छता होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता गरूड मंडपात या अलंकार स्वच्छतेला प्रारंभ झाला. या सगळ्या अलंकारांची सराफ कारागिरांनी स्वच्छता केली. यावेळी समितीचे सचिव विजय पोवार, मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव, खजिन्याचे हवालदार महेश खांडेकर उपस्थित होते.नवरात्रौत्सवाला आता केवळ चार दिवस राहिल्याने देवस्थान समितीच्या वतीने सुरू असलेल्या तयारीला वेग आला आहे. देवस्थान समितीच्या कार्यालयाशेजारी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे मांडव उभारण्यात येत आहे. 

 

 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर