हलकर्णीतील 'त्या' गटारींची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:10+5:302021-06-09T04:30:10+5:30
हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे झालेल्या जोरदार पावसाने लेंडओहोळ बसर्गे रस्त्याकडील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले होते. ओढ्याला जाणाऱ्या ...

हलकर्णीतील 'त्या' गटारींची स्वच्छता
हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे झालेल्या जोरदार पावसाने लेंडओहोळ बसर्गे रस्त्याकडील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले होते. ओढ्याला जाणाऱ्या या दोन मुख्य गटारी तुंबल्याने बुरुड, शिंत्रे, बिरंजे, पाकजादे आदी परिवारातील घरात चक्क चुलीपर्यंत गेल्याने मोठा संताप व्यक्त होत होता. ही बातमी फोटोसह रविवारी 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत हलकर्णी ग्रामपंचायतीने बाहेरचे मजूर आणून तुंबलेल्या दोन्ही बाजूच्या गटारीची स्वच्छता केली.
बसस्टँड परिसरातही मोठे पाणी दिसत होते. हे पाणी मुल्ला कादरभाई यांच्या घरात गेले होते. परिसरातील गटारीचीही स्वच्छता करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गावातील मुख्य गटारीमध्ये अनेक बांधकाम करणाऱ्यांनी अडथळा निर्माण केला आहे. याकडे लक्ष देऊन गावातील सर्वच गटारी वाहत्या कराव्यात, अशी मागणी आहे.
------------------------
फोटो ओळी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील लेंडओहोळ रस्त्यालगतच्या तुंबलेल्या गटारीची स्वच्छता सुरू होती.
क्रमांक : ०७०६२०२१-गड-०२