गांधीनगर परिसरातील नाल्यांची स्वच्छता करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:22 IST2021-05-19T04:22:53+5:302021-05-19T04:22:53+5:30
गांधीनगर पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कापड बाजारपेठ असून गांधीनगर मुख्य रस्ता हा उचगाव, गडमुडशिंगी, वळीवडे, चिंचवाड, गांधीनगर अशा पाच गावच्या ...

गांधीनगर परिसरातील नाल्यांची स्वच्छता करा
गांधीनगर पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कापड बाजारपेठ असून गांधीनगर मुख्य रस्ता हा उचगाव, गडमुडशिंगी, वळीवडे, चिंचवाड, गांधीनगर अशा पाच गावच्या हद्दीत येतो. मेनरोडपासून अगदी जवळच पंचगंगा नदी वाहते. गांधीनगर मेन रोडला दुतर्फा मोठे व्यापारी संकुल असून तेथील सर्व गटारी, प्लास्टिक कचरा व इतर कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. गडमुडशिंगीहून आलेला ओढा गांधीनगरमधून जातो. तोही कचऱ्याने तुडुंब भरला आहे. उंचगावमधील ओढ्याची स्थितीही दयनीय आहे. पहिल्या पावसामध्ये या सर्व गटारी व ओढ्यातील कचरा थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळतो. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होते. गटारे तुंबल्याने गांधीनगर मेन रोडवर व तळमजल्यामध्ये असणाऱ्या दुकानांमध्ये पाणी जाऊन व्यापाऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी गांधीनगर मेनरोडसह परिसरातील गटारी नाले साफ करावे, पंचगंगा नदीमध्ये मिसळणाऱ्या सर्व गावातील ओढे नाले साफ करण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतीला द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.