‘स्वच्छ भारतचे बोधचिन्ह चिरंतन झाले’
By Admin | Updated: November 11, 2016 00:27 IST2016-11-10T01:01:02+5:302016-11-11T00:27:18+5:30
नव्या नोटांवर स्वच्छ भारत मोहिमेचे बोधचिन्ह आहे.

‘स्वच्छ भारतचे बोधचिन्ह चिरंतन झाले’
कोल्हापूर : कोणत्याही देशाच्या चलनावर एखादे चित्र, छायाचित्र, एखादी संकल्पना येणे हे मोलाचे असते. २0१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहिमेसाठी बोधचिन्ह स्पर्धा घेतली होती. त्यात माझ्या या बोधचिन्हाला पहिला क्रमांक मिळाला. मात्र, हे बोधचिन्ह भारताच्या नव्या चलनी नोटांवरही विराजमान होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया निर्मिती जाहिरात संस्थेचे संचालक अनंत खासबारदार यांनी बुधवारी दिली.
नव्या नोटांवर स्वच्छ भारत मोहिमेचे बोधचिन्ह आहे. महात्मा गांधींच्या चष्म्याचा वापर खासबारदार यांनी या बोधचिन्हासाठी केला आहे. खासबारदार म्हणाले, माझे हे बोधचिन्ह चलनी नोटांवर आल्याने आता घराघरांत गेले. कोल्हापूरच्या मातीत निर्माण झालेले हे बोधचिन्ह चिरंतन झाल्याचे खूप मोठे समाधान मला आहे.