शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

स्वच्छ, सुंदर मलकापूरप्रती सामाजिक बांधीलकीचे कोंदण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 12:03 AM

आर. एस. लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ-सुंदर मलकापूरचे स्वप्न साकारण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने लोकसहभागाला प्राधान्य दिले आहे. यातून सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडते. समाजाचे आम्ही काही देणं लागतो या भावनेतून कार्यरत मंडळीची मोट बांधून सहकारी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट, शिक्षक-विद्यार्थी, तरुण मंडळे व लोकप्रतिनिधी यांच्या ...

आर. एस. लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ-सुंदर मलकापूरचे स्वप्न साकारण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने लोकसहभागाला प्राधान्य दिले आहे. यातून सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडते. समाजाचे आम्ही काही देणं लागतो या भावनेतून कार्यरत मंडळीची मोट बांधून सहकारी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट, शिक्षक-विद्यार्थी, तरुण मंडळे व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून स्वच्छ मलकापूरचे स्वप्न आकारत आहे.गेल्या आठ महिन्यांपासून नगरीचा चेहरामोहरा बदलत आहे. प्रशासनाने दानशूर मंडळींचा मेळ घालीत सामान्य नागरिकांचा प्रतिसाद मिळवीत मलकापूरच्या मुख्याधिकारी अ‍ॅलिसा पोरे व त्यांच्या व्यवस्थापन टीमने मलकापूरच्या सुंदरतेचा ध्यास घेतला आहे.पथनाट्य, पॉपलेट व पुस्तिकाद्वारे स्वच्छतेचा मंत्र प्रत्येकाच्या उंबरºयापर्यंत पोहोचवीत, काटेकोर नियोजनाची अंमलबजावणी, वेळीच कचºयाचा उठाव व कचरा विघटन या टप्प्याने स्वच्छतेची वीण घट्ट बनत आहे.येथील बँक आॅफ महाराष्ट्र, एच.डी.एफ.सी, अर्बन बँक, वैश्य नागरी बँक, आय.डी.बी.आय. बॅक यांच्या आर्थिक सहकार्यातून नगरीतील चौदाशे कुटुंब तसेच दुकानदार, शाळा, सार्वजनिक कार्यालयांना डस्टबिन पुरविल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणच्या आठ स्टँड बॉक्समधून चौक व गल्लीतील कचरा जमविला जातो. निर्माल्य हंड्याची सुविधा आहे. तीन ठिकाणी बायोगॅस युनिट बसवून कचºयातून इंधन निर्मिती केली जाते. पूर्वी कचराकुंडी व त्याबाहेरील कोंडावळे व दुर्गंधी हे चित्र आता बदलले आहे.दररोज चारशेच्या दरम्यान अ‍ॅपवरील सूचना हाताळल्या जातात. घरातल्या कचºयाची निर्गत दोन घंटा गाडी, एक ट्रॅक्टर व एक मैला टँकरद्वारे दैनिक स्वच्छता होते. सकाळी सहा ते दहा व सायंकाळी असे दोन वेळात या वाहनांद्वारे नगरीतील सुमारे दीड ते पावणेदोन टन कचरा जमवून, थेट उचल करून येथील कचरा विघटन प्रकल्पात प्रक्रियेसाठी जातो. तेथे दररोज सहा कामगार व एक जेसीबी मशीनद्वारे ओला व सुका कचरा तसेच प्लास्टिक काचा, लोखंड यांची वर्गवारी होते. गेल्या चाळीस वर्षांत येथील कचरा डेपो हजारो टनांचा कचरा घेऊन जातो. मात्र, स्क्रीन स्कॅनरने दररोज कचºयाचे व्यवस्थापन केले जात आहे व त्याचे विघटन होत आहे. यातून दररोज ७०० किलो सेंद्रिय खत तयार होते. हे खत प्रति गाडी ६३० रुपयांनी शेतकºयांना उपलब्ध केले आहे. गेल्या दीड महिन्यात दीड लाख रुपये उत्पन्न पालिके ला खतातून मिळाळे. हा निधी स्वच्छतेच्या उपक्रमात सातत्य राखण्यास सोईचा ठरत आहे. शुक्रवार व मंगळवारी बाजार संपताच रात्रीत सारे शहर स्वच्छ करणारी खास यंत्रणा राबते. सांडपाण्याच्या व्यवस्थेने जलप्रदूषण रोखले जाते.प्रोत्साहन निधी व १४ व्या वित्त आयोगातून ७० कुटुंबांना शौचालय बांधण्यास निधी दिला आहे. सहा विभागांतून दोन कुटुंबात एक शौचालय युनिट उपलब्ध केले आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे व शौचालयाच्या दुरुस्तीसाठी कृष्णा पाटील, राजेश लाड, विजय भिंगार्डे, राकेश गायकवाड, शंतनू कोठावळे, पॅटसन कोल्हापूर यांनी साठ हजारांवर देणगी दिली आहे. समाज संपर्कातील रूपेश वारंगे, विनायक हिरवे, आबा पडवळ या स्वच्छता दुतासह व मेघा स्वामी या समन्वयक संपर्क भेटीद्वारे जागृती करीत आहेत. स्वच्छ शाळा, स्वच्छ हॉटेल यांची निवड करून प्रोत्साहनात्मक स्पर्धा रुजविली जात आहे. अभ्यास दौरा, विविध स्पर्धा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्पिकरवरील प्रचार, वर्धापन दिन, खाद्य महोत्सव, वाचनालयाची व्याख्यानमाला या निमिताने स्वच्छ मलकापूरचा संदेश रुजविण्यावर भर दिला आहे.वर्धापनदिनी कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या महिला कलाकारांनी सामाजिक प्रश्नावर नाटिका सादर करून महिला, बचत गट व विद्यार्थिनी यांच्यात जागृती घडविली.प्लास्टिक पिशवी बंदप्लास्टिक पिशवी बंदीचा प्रारंभ नगरीतील स्टॉलधारकांनी केला. प्लास्टिक बंद करताना कागदी व कापडी पिशव्या पुरविणारी समांतर व्यवस्था उभी केली आहे. महिला व शालेय विद्यार्थ्यांना तसे प्रशिक्षण देऊन या पिशव्यांचा वापर रुजविला आहे, तर प्लास्टिक बाटली क्रश करणारे मशीन बसवून दररोज बाजार, स्टँड, महामार्ग, नदीपात्र ते घर दरम्यान पडणारी बाटली जमवून मशीनद्वारे बारीक तुकड्यात रूपांतरित केली जाते.स्वच्छता दैनंदिनी गरजस्वच्छतेची ही मोहीम न राहता ही नागरिकांची दैनंदिन बाब बनावी हे उद्दिष्ट ठेवूनच स्वच्छतेचा उपक्रम राबवत असल्याचा विश्वास नगराध्यक्ष अमोल केसरकर व मुख्याधिकारी अ‍ॅलिसा पोरे यांनी व्यक्त केला. उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, बांधकाम सभापती प्रवीण प्रभावळेकर व नगरसेवकाचे नियंत्रण मोलाचे ठरत आहे.