पाचवी ते आठवीचे वर्ग सुरक्षित वातावरणामध्येच होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:36+5:302021-01-17T04:21:36+5:30
कोल्हापूर : पालकांची परवानगी, शिक्षकांची कोरोना तपासणी करणे, शाळाचे निर्जंतुकीकरण करणे, आदी उपयायोजना केल्यानंतरच नववी ते बारावीचे वर्ग सुरू ...

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरक्षित वातावरणामध्येच होणार सुरू
कोल्हापूर : पालकांची परवानगी, शिक्षकांची कोरोना तपासणी करणे, शाळाचे निर्जंतुकीकरण करणे, आदी उपयायोजना केल्यानंतरच नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्याच प्रकारे दुसऱ्या टप्प्यामध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २७ जानेवारीपासून सुरक्षित वातावरणामध्ये शाळा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या, कोरोनामध्ये शाळांबाबत निर्णय घेण्याचे मोठे आव्हान होते. यावर पर्याय म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमांतून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. कोरोनामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना संकटांना सामोरे जायला लागू नये यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
चौकट
दहावी-बारावीची परीक्षा एप्रिलच्या अखेरीस
कोरोनामुळे एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. यामुळेच दहावी आणि बारावीची परीक्षा एप्रिलच्या अखेरीस घेण्याचे नियाेजन असल्याचे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.