शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोर फिल्मी स्टाईल राडा; एकमेकांना भिडले, उचलून आपटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:40 IST

नऊजणांवर गुन्हा, पोलिसांचा धाक संपला का?

जयसिंगपूर : जयसिंगपूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटांनी पोलिस ठाण्याबाहेबरच एकमेकांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली. गावात जाऊन वाद मिटवतो, असे सांगून बाहेर पडलेल्या या दोन्ही गटांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अक्षरश: उचलून जमिनीवर आपटले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.उदगाव (ता. शिरोळ) येथील माहेश्वरी राजेंद्र पाटील व श्रीवर्धन वरेकर हे एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी सकाळी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आमच्या गावातील वाद आहे, आम्ही गावात जाऊन बैठक घेतो, असे सांगून ते पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. प्रवेशद्वाराबाहेर येताच त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत एकमेकांना उचलून आपटत ‘फिल्मी स्टाईल’ने सुरू झालेल्या या हाणामारीमुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली. अचानक झालेल्या हाणामारीमुळे परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद थांबविण्यात आला. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पोलिस ठाण्यासमोरच हाणामारीची घटना घडल्याने पोलिस कॉन्स्टेबल फारूक जमादार यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर राजेंद्र बंडू पाटील (४२), माहेश्वरी राजेंद्र पाटील (३५), युवराज राजेंद्र पाटील (२०), गंधराज राजेंद्र पाटील (१९), मंगल बंडू पाटील (४०), श्रीवर्धन गिरीश वरेकर (२६), शरद पांडुरंग लुगडे (४२), शिरीष तुकाराम वरेकर (६०) व हेमलता वरेकर (सर्व रा.माळवाडी, उदगाव) अशी संशयित आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.पोलिसांचा धाक संपला का?पोलिस ठाण्यासमोरच लोक भिडतात, यावरून कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांच्या समोरच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांना न जुमानता मारहाण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पोलिसांचा दरारा संपला की काय, अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Clash Erupts Outside Jaysingpur Police Station; Nine Booked

Web Summary : Two groups clashed violently outside Jaysingpur police station while filing complaints. Nine individuals from both sides have been booked following the incident, which involved physical altercations and was captured on video.