कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेला थेट गॅसपाईपलाईनचा प्रस्ताव अखेर मंगळवारी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. खुदाई केल्यानंतर तात्काळ रस्ता करण्यात यावा, अशी उपसूचना देण्यात आली. खासदार संभाजीराजे यांनी हा प्रकल्प मंजूर करून आणला असून तो मार्गी लागला नसल्याने त्यांनी मध्यंतरी नाराजी व्यक्त केली होती.गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, प्रस्तावाला कधीही विरोध नव्हता. मात्र, यापूर्वी ठेकेदारांनी खुदाई केल्यानंतर रस्ता नव्याने केलेले नसल्याचा अनुभव आहे. या प्रकल्पामध्ये रस्त्यांची जबाबदारी महापालिका प्रशासनाने घेतली पाहिजे. काम झाल्यानंतर रस्ता तात्काळ डांबरीकरण करावा, हीच सर्व सदस्यांची भूमिका आहे. गटनेते सत्यजित कदम म्हणाले, हा प्रकल्प लोकांच्या फायदासाठी असून व्यावसायिक उद्देश नाही. त्यामुळे खुदाई दरावरुन काम रखडले म्हणून महापालिकेचे बदनामी होवू नये. सदस्य अशोक जाधव यांनीही अशीच भूमिका मांडली.कोरोनामुळे मयत कर्मचाय्रांच्या नातेवाईकांना भरपाई त्वरीत द्याकोरोना बाधित कर्मचाय्रांना २८ दिवसांची विशेष रजा मंजूर करावी, अशी सूचना सदस्य प्रा. जयंत पाटील यांनी केली. सदस्य नकाते म्हणाले, स्मशानभूमीतील मयत कर्मचाय्राच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. मयत कर्मचाय्रांच्या वारसाना तात्काळ सेवेत घ्यावे. अशी सूचना सदस्य अशोक जाधव यांनी केली. गटनेते विजय सूर्यवंशी यांनी विमाची रक्कम मिळण्यास विलंब का होत आहे, असा सवाल केला. कोरोना अहवाल निगेटीव्ह मात्र, एचआर सिटी स्कॅन पॉझिटीव्ह येणाय्रांनाही मदत मिळाली पाहिजे, अशी सूचनाही करण्यात आली.
शहरातील थेट गॅसपाईपलाईनला अखेर मंजूरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:59 IST
Muncipal Corporation, Sambhaji Raje Chhatrapati, gaspipeline, kolhapurnews गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेला थेट गॅसपाईपलाईनचा प्रस्ताव अखेर मंगळवारी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. खुदाई केल्यानंतर तात्काळ रस्ता करण्यात यावा, अशी उपसूचना देण्यात आली. खासदार संभाजीराजे यांनी हा प्रकल्प मंजूर करून आणला असून तो मार्गी लागला नसल्याने त्यांनी मध्यंतरी नाराजी व्यक्त केली होती.
शहरातील थेट गॅसपाईपलाईनला अखेर मंजूरी
ठळक मुद्देशहरातील थेट गॅसपाईपलाईनला अखेर मंजूरीरस्ते करण्याची अट : खासदार संभाजीराजे यांनी आणला प्रकल्प