शहर संजय गांधी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST2021-02-05T07:09:08+5:302021-02-05T07:09:08+5:30
(फोटो- ३००१३२०२१- कोल- नरेंद्र पायमल निवड) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शहर (उत्तर) संजय गांधी निराधार अनुदान योजना ...

शहर संजय गांधी योजना
(फोटो- ३००१३२०२१- कोल- नरेंद्र पायमल निवड)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शहर (उत्तर) संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र हरीभाऊ पायमल (मंगळवार पेठ) यांची निवड झाली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी समिती जाहीर केली. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती अशासकीय प्रतिनिधी अमोल राजेंद्र कांबळे, महिला अशासकीय प्रतिनिधी चंदा संतोष बेलेकर, इतर मागासवर्गीय / विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी रफिक हारुण शेख, सागर दिलीप पोवार, सर्वसाधारण प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी शशिकांत रामचंद्र बिडकर, अपंग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी दीपाली आकाश शिंदे, स्वयंसेवी संस्थेचा अशासकीय प्रतिनिधी मिलिंद केरबा वावरे, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती अशासकीय प्रतिनिधी विशाल शिवाजीराव चव्हाण, ज्येठ नागरिक अशासकीय प्रतिनिधी सुनील देसाई यांची निवड झाली.