शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अवघे शहर शिवमय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 00:31 IST

आज शिवजयंती : करवीरनगरीत निघणार भव्य मिरवणुका

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांचा पराक्रम नुसता ऐकूनही तरुणांच्या अंगात चैतन्याची लाट उसळते. शिवजयंतीनिमित्त या सळसळत्या रक्ताच्या तरुणाईची अनवाणी पावले डोंगरकपारींतील पाऊलवाटा तुडवीत मैलोन्मैल धावत जाऊन शिवज्योत आणण्यासाठी शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या गडांवर पोहोचली आहेत; तर शहरातील विविध पेठांमध्ये शिवजयंतीची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. शिवजयंतीला अवघे काही तास शिल्लक राहिल्याने आबालवृद्धांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पारंपरिक शिवजयंती विधायक उपक्रमांद्वारे साजरी करण्याची पद्धत सध्या रुजताना दिसत आहे. कुणी सामाजिक उपक्रम राबवून गरजंूना मदतीचा हात देत आहे, तर कुणी साहसी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवीत आहे. कुणी शिवचरित्रावर आधारित व्याख्यानमाला सुरू केली आहे, तर कुणी भव्य मिरवणुकीची तयारी केली आहे. आधुनिकता आणि पारंपरिकता या दोन्ही गोष्टींचा मेळ घालत आज, शुक्रवारी होणारी शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्याची प्रत्येकाने तयारी केली आहे.शिवाजी चौक, शिवाजी पेठेतील अर्धा शिवाजी पुतळा येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकांसाठी पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे. रात्री उशिरापर्यंत विविध गडांहून शिवज्योती घेऊन युवकांचे जत्थे ढोल-ताशांच्या गजरात कोल्हापुरात दाखल होत होते. आज सकाळी १० वाजून १० मिनिटांनी शिवजन्मकाळ सोहळा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी शहरात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. धनगरी ढोलसंयुक्त उत्तरेश्वर पेठ शिवजयंती समितीच्या वतीने सकाळी किल्ले पन्हाळागडावरून शिवज्योत आणण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजून १० मिनिटांनी शिवजन्मकाळ सोहळा होणार आहे. दुपारी ४.३० वाजता उत्तरेश्वर मंदिर येथून शिवजयंती मिरवणूक काढण्यात येणार आहे. धनगरी ढोल, बॅँड पथक, लेझीम यांसह वारकरी संप्रदाय, पारंपरिक शिवकालीन पोशाख हे मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे. गंगावेश, रंकाळावेश, ताराबाई रोड, पापाची तिकटी, शिवाजी पुतळा, जोशी गल्ली, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर चौक येथे सांगता होईल. संयुक्त जुना बुधवार पेठेची भव्य मिरवणूकसंयुक्त जुना बुधवार पेठेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंतीदिनी भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. छत्रपती शिवरायांचा भव्य सिंहासनारूढ पुतळा मिरवणुकीच्या अग्रस्थानी असणार आहे; तर घोडे, पारंपरिक वेशातील मावळे, समाजप्रबोधनात्मक फलक हे मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे. मिरवणुकीच्या मार्गावर विद्युत रोषणाई केली जाणार आहे.शिवशाही अवतरणारसंयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सवांतर्गत आज, शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पंचरत्न शाहीर धोंडिराम मगदूम यांचा पोवाडा होईल. त्यानंतर शिवजन्म उत्सव होईल. त्यानंतर दुपारी चार वाजता सायबर चौक येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये शिवपालखी, सजीव देखावे, घोडे, उंट, बैलगाडीचा सहभाग, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके मिरवणुकीत होणार आहेत; तर सावंतवाडी येथील ढोल-ताशे हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असेल. शिव-बसव जयंती उत्सव जिल्हा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने शिवजयंती व बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधत चित्रदुर्ग मठ येथे सायंकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात येणार आहे.१० फुटी अश्वारूढ शिवमूर्तीमंगळवार पेठ राजर्र्षी शाहू तरुण मंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशा, प्रबोधनात्मक फलक आणि पारंपरिक पोशाखातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या मिरवणुकीमध्ये आसपासच्या परिसरातील जवळपास १०० मंडळांचे पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांसह सहभागी होणार आहेत. यासह मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मिरवणुकीत शिवछत्रपतींची १० फुटी अश्वारूढ मूर्ती असणार आहे. मुंबईचे भद्रकाली बेंजो पथक, सजीव देखावे संयुक्त रविवार पेठ शिवजयंती समितीच्या वतीने आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये मुंबईचे भद्रकाली बेंजो पथक व शिवकालीन सजीव देखावे हे आकर्षण असणार आहे. यासह आकर्षक विद्युत रोषणाई व ढोल-ताशा पथक मिरवणुकीच्या अग्रस्थानी असणार आहे.नेटिझन्सही सज्जइंटरनेटच्या आजच्या युगात नेटिझन्सनही शिवजयंती साजरी करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिवसभर दिसत होते. शिवरायांचे विविध प्रकारचे फोटो, अ‍ॅनिमेशन, संदेश यांच्या माध्यमातून इंटरनेटवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, फेसबुक अशा विविध माध्यमांतून शिवजयंतीच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.कैलासगडची स्वारी मंदिर मंगळवार पेठ परिसरातील कैलासगडची स्वारी मंदिरात सकाळी ११.४५ वाजता शिवजन्मकाळ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी परिसरातील महिलांच्या हस्ते पाळण्याचा सोहळा होणार आहे.