बॉम्बशोध पथकाकडून शहराची तपासणी
By Admin | Updated: September 3, 2014 00:39 IST2014-09-03T00:39:26+5:302014-09-03T00:39:26+5:30
गणेश मंडळाच्या सजावटीच्या ठिकाणी

बॉम्बशोध पथकाकडून शहराची तपासणी
कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलाच्या बॉम्बशोध पथकाने मंगळवारी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिरासह कोल्हापूर शहर व इचलकरंजी शहर परिसरातील गणेश मंडळाच्या सजावटीच्या ठिकाणी तपासणी केली. दक्षतेचा उपाय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या सूचनेवरून ही तपासणी करण्यात येत आहे.
घरगुती गणेश विसर्जनानंतर देखावे पाहण्यासाठी लाखो गणेशभक्त रस्त्यावर उतरलेले असतात. अशावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस दलाच्यावतीने दक्षता घेतली आहे. शाहू टोलनाक्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाची गांभीर्याने दखल घेत कोल्हापूरसह इचलकरंजीतील तरुण मंडळांच्या सजावटीची तपासणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)