शहरात ‘ऋणानुबंध,’ तर ग्रामीणमध्ये ‘इतिकर्तव्यता’ प्रथम
By Admin | Updated: January 19, 2017 00:44 IST2017-01-19T00:44:12+5:302017-01-19T00:44:12+5:30
रंगली पर्यावरण बालनाट्य स्पर्धा : २९ शाळांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग

शहरात ‘ऋणानुबंध,’ तर ग्रामीणमध्ये ‘इतिकर्तव्यता’ प्रथम
कोल्हापूर : पर्यावरणाच्या समस्येवर भाष्य करीत प्रबोधन करणाऱ्या ‘ऋणानुबंध’ व ‘इतिकर्तव्यता’ या कलाकृतींनी नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
मुलांमध्ये विद्यार्थिदशेतच पर्यावरणाविषयक जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने इकोफोक्स व्हेंचर्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आणि प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे बुधवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत शहरी व ग्रामीण भागांतून २९ शाळांच्या संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे उद्घाटन आरेन हर्डीकर, प्रदीप गबाळे यांच्या हस्ते झाले.
दिवसभर सुरू असलेल्या पर्यावरण बालनाट्य स्पर्धेत विविध नाटिकांचे सादरीकरण झाले. परीक्षक म्हणून संजय जोग, मिलिंद सिकनीस यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील विजेते असे :
शहरी विभाग : सांघिक : ऋणानुबंध- म.ल.ग. हायस्कूल (प्रथम), धैर्य- एम. आर. पाटील विद्यानिकेतन (द्वितीय), जीवनदायिनी- ल. कृ. जरग हायस्कूल (तृतीय).
उत्कृष्ट लेखन : आर. ए. स्वामी- प्रथम (टाळी आनंदे), विशाखा जितकर- द्वितीय (ऋणानुबंध), राजेंद्र कांडगावकर- तृतीय (धीन धीन धा).
उत्कृष्ट दिग्दर्शन : विशाखा जितकर- प्रथम (ऋणानुबंध), प्राचार्या अरुणा पाटील- द्वितीय (धैर्य), डी. के. रायकर- तृतीय (आटपाट नगरीचा बजरंगी राजा).
उत्कृष्ट अभिनय : मुले : श्रेयस भागवत- प्रथम (एलियन), प्रतीक बनगे- द्वितीय ( श्रीपती), मनीष कुलकर्णी- तृतीय (जीवनदायिनी). मुली : ऋचा जोशी- प्रथम (जीवनदायिनी), धैर्या धारवाडकर- द्वितीय (ऋणानुबंध), नम्रता काशीद- तृतीय (कचरा नका करू)
ग्रामीण विभाग : सांघिक : इतिकर्तव्यता - विद्यामंदिर देसाईवाडी (प्रथम), भारूड पर्यावरणाचे- माध्यमिक विद्यालय, कळंबा (द्वितीय), पर्यावरणाचा ध्यास हाच गावचा विकास- ज्योतिर्लिंग हायस्कूल, बोरगाव (तृतीय)
उत्कृष्ट लेखन : मिलिंद कोपार्डेकर-प्रथम (भारूड पर्यावरणाचा), पी. एन. कांबळे - द्वितीय (पर्यावरणाचा ध्यास हाच गावचा विकास), संतोष आंबी- तृतीय (एकट्याने काय फरक पडतो?)
उत्कृष्ट दिग्दर्शन : मिलिंद कोपार्डेकर- प्रथम (भारूड पर्यावरणाचे), गणपती मांडवकर- द्वितीय (इतिकर्तव्यता), एम. व्ही. कांबळे- तृतीय (पर्यावरणाचा ध्यास हाच गावचा विकास)
उत्कृष्ट अभिनय : मुले : विश्वजित चव्हाण- प्रथम (पर्यावरणाचा ध्यास हाच गावचा विकास), शुभम पाटील- द्वितीय (मी तुमचीच हाक वसुंधरे), प्रशिक काळे- तृतीय (गण्या), मुली : वैष्णवी पाटील- प्रथम (वसुंधरा), संध्या आवळे- द्वितीय (बुवा), सानिया पोवार- तृतीय (ऊठ माणसा, जागा हो.)