नियम तोडणाऱ्या नागरिक, दुकानांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST2021-04-28T04:25:01+5:302021-04-28T04:25:01+5:30

तीन दिवसांपूर्वी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन उपाययोजना करण्यासंबंधी स्पष्ट निर्देश दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून ...

Citizens who break the rules, punitive action against shops | नियम तोडणाऱ्या नागरिक, दुकानांवर दंडात्मक कारवाई

नियम तोडणाऱ्या नागरिक, दुकानांवर दंडात्मक कारवाई

तीन दिवसांपूर्वी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन उपाययोजना करण्यासंबंधी स्पष्ट निर्देश दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून ग्रामपंचायतीने नियम तोडणाऱ्या नागरिक व दुकानदार, भाजीपाला व्यावसायिक,उद्योजक यांच्यावर कारवाई केली. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येस आळा बसण्यासाठी सर्व उपाययोजना गावात करण्यात येत असून नियम मोडणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये. तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सरपंच कलीमुन नदाफ यांनी केले. तर गावासाठी जादा कोरोना लस उपलब्ध व्हावी, अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचेही सांगितले.

या कारवाईवेळी ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी, ग्रामपंचायत सदस्य ॲड. हिदायत नदाफ, सलीम पेंढारी, तलाठी चांदणे, पोलीस पाटील अनुराधा कांबळे सतीश माने उपस्थित होते.

फोटो ओळ-उदगाव (ता.शिरोळ) ग्रामपंचायतीच्यावतीने नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध मंगळवारी धडक मोहीम राबविण्यात आली.

छाया-अजित चौगुले, उदगाव

Web Title: Citizens who break the rules, punitive action against shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.