शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Maharashtra रुग्णांच्या संख्येत वाढ नागरिकांनी अजिबात घाबरु नये - जिल्हाधिकारी दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:01 IST

रत्येक बाहेरुन आलेल्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तो गृह अलगीकरणात, संस्थात्मक अलगीकरणात राहतो की नाही. सामाजिक अंतर ठेवतो का यावर नजर ठेवावी. जेणेकरुन कोणताही धोका होणार नाही, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

ठळक मुद्देरेड झोनमधून येणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणी; रुग्णांच्या संख्येत वाढनागरिकांनी अजिबात घाबरु नये;स्वॅब तपासणीमुळे प्रादुर्भावास प्रतिबंध

कोल्हापूर : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई, पुणे आणि सोलापूर या ठिकाणाहून रेड झोन आणि कंटेन्मेंट झोनमधून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले आहेत. परिणामी बाधित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही तपासणी केली नसती तर गावामध्ये फार मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरु नये परंतु, योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.            जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून वाढत आहे. आज ती संख्या सकाळी 134 होती. याचे एकमेव कारण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई, पुणे आणि सोलापूर या ठिकाणाहून रेड झोन आणि कंटेन्मेंट झोनमधून मोठ्या प्रमाणात व्यक्ती जिल्ह्यात आल्या आहेत. यामधील जास्तीत जास्त  लोकांच्या स्वॅब तपासणीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, यानुसार ही तपासणी केली.

आता या तपासणीचे अहवाल आता येत आहेत. बाहेरुन आलेल्या सर्व लोकांचे अहवाल हे पॉझिटिव्ह येत आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशाचा समावेश नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणीही घाबरुन जावू नये. हे जर पाऊल आपण उचललं नसतं तर हे बाधित लोक गावा गावात गेले असते आणि मोठ्या प्रमाणात गावातल्या लोकांना झाला असता. जरी या लोकांना गृह अलगीकरण किंवा संस्थात्मक अलगीकरणात ठेवले असते तरी या लोकांच्या बेसावधतेमुळे इतरांना प्रादुर्भाव झाला असता. हा प्रादुर्भाव या पध्दतीने तपासणी करुन वाचवला आहे. 

कोव्हिड केअर सेंटरमध्ये तपासणी करावी            विना परवानगी, वेगवेगळ्या मार्गाने, माल वाहतूक वाहनामधून गावा गावात आलेले आहेत. अशा लोकांनी ज्यांची तपासणी झाली नाही, अशा लोकांना त्यांच्या कुटुंबियांनी, ग्रामस्थांनी कोव्हिड केअर सेंटरमध्ये घेवून जाणे आवश्यक आहे, त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यांना कोणतीही लक्षणे असतील तर अशा लोकांना तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात संपर्क करावा. जेणेकरुन त्यांच्या कुटुंबियांना तसेच ग्रामस्थांना प्रादुर्भाव होणार नाही. आपल्या जिल्ह्यालाही धोका होणार नाही. पॉझिटिव्ह येणाऱ्या सर्व रुग्णांना सीपीआर, डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालय किंवा तालुकास्तरावरील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. त्यामुळे यांच्यापासून इतरांना कोणताही धोका नाही. पण गावातल्या, शहरातल्या लोकांनी सावध राहणे आवश्यक आहे. प्रत्येक बाहेरुन आलेल्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तो गृह अलगीकरणात, संस्थात्मक अलगीकरणात राहतो की नाही. सामाजिक अंतर ठेवतो का यावर नजर ठेवावी. जेणेकरुन कोणताही धोका होणार नाही, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.              

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस