स्वच्छ सर्वेक्षणसाठी नागरिकांनी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:26 IST2021-02-11T04:26:03+5:302021-02-11T04:26:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिका शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये सहभागी झाली आहे. त्यामध्ये अग्रक्रम मिळण्यासाठी नागरिकांनी ...

स्वच्छ सर्वेक्षणसाठी नागरिकांनी सहकार्य करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिका शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये सहभागी झाली आहे. त्यामध्ये अग्रक्रम मिळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी पत्रकार बैठकीत केले.
स्वच्छ सर्वेक्षण योजनेत गतवर्षीही नगरपालिकेने सहभाग घेतला होता. त्यामध्ये ८९ व्या क्रमांकावर इचलकरंजी शहर होते. ते यंदा पहिल्या १ ते १० मध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून, हे अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यशाळा व जनजागृती सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत प्रशासनाने कर्मचारी व नगरसेवकांची कार्यशाळा घेतली आहे. तसेच जनजागृतीसाठी प्रत्येक घरावर त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक माहिती प्रसारित करण्यात येणार आहे. त्यानुसार नागरिकांनी सहभागी होऊन नगरपालिकेच्या स्वच्छतेविषयी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देऊन चांगले मानांकन मिळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.