ग्राहकहित संरक्षणाबाबत नागरिकांनी जागरूक व्हावे -- सविता भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 01:09 PM2019-11-21T13:09:44+5:302019-11-21T13:11:19+5:30

भोसले म्हणाल्या, या कायद्यामध्ये सुचविण्यात आलेल्या सुधारणेनुसार ‘जिल्हा आयोग’ असा शब्दप्रयोग करण्यात येणार असून, एक कोटीपर्यंतच्या तक्रारींची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे. हा बदल नवीन वर्षात लागू होण्याची अपेक्षा आहे.

Citizens should be aware of consumer protection | ग्राहकहित संरक्षणाबाबत नागरिकांनी जागरूक व्हावे -- सविता भोसले

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात बुधवारी ‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेअंतर्गत शासकीय सदस्य आणि अधिकारी यांच्या प्र्रशिक्षणप्रसंगी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष सविता भोसले यांनी मार्गदर्शन केले.

Next
ठळक मुद्दे ‘जागो ग्राहक जागो’ मोहीम

कोल्हापूर : कोणत्याही पातळीवर ग्राहकांची फसवणूक होऊ नये व त्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे यासाठी १९८६ साली कायदा झाला. याबाबत ग्राहकांनी जागरूक व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष सविता भोसले यांनी बुधवारी केले.

येथील शाहू स्मारक भवनात ‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेअंतर्गत शासकीय सदस्य आणि अधिकारी यांच्या प्र्रशिक्षणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अरुण यादव उपस्थित होते.

भोसले म्हणाल्या, या कायद्यामध्ये सुचविण्यात आलेल्या सुधारणेनुसार ‘जिल्हा आयोग’ असा शब्दप्रयोग करण्यात येणार असून, एक कोटीपर्यंतच्या तक्रारींची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे. हा बदल नवीन वर्षात लागू होण्याची अपेक्षा आहे.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे ग्राहक आॅनलाईन खरेदीच्या तक्रारीही दाखल करू शकतो. कर्ज प्रकरणातील अटी-शर्ती, विमा कंपन्यांबाबतही आपण जागरूक असायला हवे. शेतकरी हाही ग्राहकच असतो. बी-बियाणे, पाईपलाईन जोडणी प्रकरणात त्याचीही फसवणूक होऊ शकते. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे धाव घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.

जिल्हा तांत्रिक समन्वयक करण गायकवाड यांनी अन्नसुरक्षा कायदा, ई-पॉस मशीन याबाबत अन्न प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, औषध प्रशासनाच्या साहाय्यक आयुक्त मनीषा पाटील, जिल्हा सार्वजनिक आरोग्य शाळेचे अन्नविश्लेषक डॉ. रवींद्र शिंदे यांनी भेसळीबाबत किंवा वस्तूचा दर्जा ठरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळांची माहिती यावर मार्गदर्शन केले; तर उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी कृषिक्षेत्रातील शासनाच्या योजना याविषयी मार्गदर्शन केले. अन्नवितरण अधिकारी माधवी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात बुधवारी ‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेअंतर्गत शासकीय सदस्य आणि अधिकारी यांच्या प्र्रशिक्षणप्रसंगी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष सविता भोसले यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Citizens should be aware of consumer protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.