कोडोलीत लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:25 IST2021-04-16T04:25:22+5:302021-04-16T04:25:22+5:30

कोडोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधामुळे कोडोलीत सर्वत्र शुकशुकाट होते. नागरिकांनीही बाहेर न पडण्याचे ...

Citizens respond to Kodoli lockdown | कोडोलीत लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद

कोडोलीत लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद

कोडोली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधामुळे कोडोलीत सर्वत्र शुकशुकाट होते. नागरिकांनीही बाहेर न पडण्याचे आवाहन कोडोली पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे आठवडा बाजार पूर्णपणे बंद होता.

कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी राज्यात पंधरा दिवसांसाठी ‘ब्रेक द चेन’चा निर्बंध बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून सुरुवात झाला. लॉकडाऊन होणार म्हणून नागरिकांनी बुधवारी बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला खरेदीसाठी भाजीमंडईत तुफान गर्दी केली होती. यावेळी फिजिकल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडला होता. बसस्थानकाकडे कोणीही प्रवासी न आल्याने कोडोली स्थानकात एकही एसटी बस आली नाही. अत्यावश्यक सेवा, औषध दुकाने, शेतीविषयक दुकाने, बेकरी, किराणा दुकान असे चालू असले तरी व्यापार उलाढाल किरकोळ स्वरूपातच झाली. कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांनी सकाळपासून नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन पोलीस गाडी फिरवून केले होते.

Web Title: Citizens respond to Kodoli lockdown