शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

Kolhapur: 'महादेवी' हत्तीणसाठी मोर्चा गावात धडकला.. 'वनतारा'साठी गाड्या गावाजवळ थडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 13:36 IST

चार दिवसांपासून अ‍ॅनिमल अ‍ॅम्ब्युलन्स हायवेवर

जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाचा माधुरी उर्फ महादेवी हत्तीण गुजरात येथील वनतारा हत्तीण केंद्रात कोणत्याही परिस्थिती देणार नाही, ही भूमिका कायम ठेवून शुक्रवारी हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय लोक एकवटले. हत्तीण बचावासाठी गाव बंद ठेवून मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात समस्त जैन समाज व नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, मूक मोर्चा झाल्यानंतर आम्ही हत्ती देणार नाही, अशा तीव्र भावना व्यक्त केल्या. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलबाहेर हत्ती नेण्यासाठी गुजरातहून आलेल्या दोन गाड्या थांबल्या आहेत. त्यामुळे हत्तीणीला लवकरच हलविले जाणार असल्याचे वातावरण असल्याने नांदणीकरांचा संभ्रम वाढला आहे.नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाकडे चारशे वर्षांपासून हत्ती आहे. एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदविले होते. त्यानुसार नांदणी येथील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणला गुजरात येथे दोन आठवड्यांत पाठविण्याचे परवानगी दिली आहे; मात्र, नांदणी मठाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.या पार्श्वभूमीवर हत्ती केंद्राचे पथक गुरुवारी रात्री हत्तीला नेण्यासाठी येणार असल्याचा समज निर्माण झाल्याने नागरिक रस्त्यावर उतरले होते. कोणत्याही परिस्थितीत हत्तीला नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेत शुक्रवारी नांदणी येथे मूक मोर्चाचे आवाहन केले होते.सकाळी नांदणी येथील गांधी चौकातून मूक मोर्चाला सुरुवात झाली. भरत बँक येथून बाजारपेठ, ग्रामपंचायत, कुरुंदवाड रोड, भैरवनाथ मंदिर पुन्हा यासह विविध मार्गासह येत जयसिंगपूर मार्गावरील निशीधी येथे मोर्चा विसर्जित झाला. त्यानंतर नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, सावकार मादनाईक, पृथ्वीराजसिंह यादव, आप्पासो लठ्ठे, शेखर पाटील, डॉ.सागर पाटील, अजय पाटील-यड्रावकर, युनूस पटेल, सागर शंभूशेट्टे, वैभव उगळे आदी सहभागी झाले होते. शिरोळ व जयसिंगपूर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

सुनावणी तारखेकडे लक्षहत्ती नांदणी मठाकडे राहण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुढे गेली आहे. तत्काळ सुनावणी घेण्यासाठी उच्च न्यायालयाला विनंती केली आहे. याबाबतची तारीख लवकरच निश्चित होणार आहे.

मूक मोर्चात लक्षवेधी फलकमूक मोर्चात नांदणी पंचक्रोशीतून सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. यावेळी गाव बंद ठेवून हत्तीण बचावासाठी सर्वांनी पाठिंबा दिला. मोर्चात आपली हत्ती, आपली परंपरा, लढायचं भिडायचं ते आपल्या माधुरीसाठीच, शांततेच्या मार्गाने लढू अखेरपर्यंत माधुरीसाठीच भिडू, लढाई माधुरीच्या अस्तित्वासाठी, लोकलढा उभारू अस्तित्व जपण्यासाठी, संघर्ष करू दक्षिण भारताची शान राखण्यासाठी असे फलक लक्षवेधी ठरले.

मागितला तर बंदोबस्त मिळणारहत्तीला दोन आठवड्यांत नेण्याचे आदेश देण्यात आल्याने गुजरात पासिंगच्या दोन गाड्या कोल्हापूर जिल्ह्याच्या वेशीजवळ येऊन थांबला आहेत. दि.३१ तारखेपर्यंत कधीही याबाबत कार्यवाही होवू शकते. यासाठी वनविभागाने पोलिसांकडे बंदोबस्त मागितला तर दिला जाऊ शकताे.

मुक्काम जिल्ह्याबाहेर का..हत्तीणीला नेण्यासाठी हे पथक गेल्या चार दिवसापासून या हॉटेलबाहेर थांबले आहे. मात्र चालक दोन दिवसापासून आलो असल्याचे सांगत आहेत. शिवाय आम्ही बंगरूळला जाणार आहोत असे सांगितले जात आहे. हे पथक हत्तीणीला नेण्यासाठीच आले असले तर एवढी लपवाछपवी का? असा सवाल केला जात आहे.

हत्तीची वैद्यकीय तपासणीनांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या माधुरी उर्फ महादेवी हत्तिणीला नेण्यासाठी नागरिकांचा विरोध असल्याने वनताराचे पथक अद्याप नांदणी येथे आलेले नाही. मात्र शुक्रवारी दुपारी वनविभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी हत्तीची वैद्यकीय तपासणी केली.

विशेष हत्ती कल्याण केंद्रात नेणारन्यायालयाने दोन आठवड्यात हत्तिणीला गुजरात येथे पाठविण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील वनतारा राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्रात नेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीजवळ हे पथक दाखल झाले आहे. हत्तीला नेण्यासाठी नागरिकांचा विरोध असल्याने पथकाचा मुक्काम वाढला आहे.दरम्यान, शुक्रवारी दुपारी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्यासह कर्मचारी यांच्या उपस्थितीत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. देशमुख यांच्या पथकाने हत्तीची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी शिरोळ पोलिस देखील उपस्थित होते.