शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वणवा विझविणाऱ्या तरुणांसाठी सरसावले मदतीचे हात, आगीत जळाली दुचाकी; दुचाकीसाठी जमवतायत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 12:48 IST

आग विझविण्याच्या प्रयत्न करत असताना मोटरसायकल जळून खाक झाली

उत्कर्षा पोतदारउत्तुर : बेलेवाडी घाटात बुधवारी दुपारी वणवा विझविताना जळलेल्या मोटरसायकलची भरपाई करून देण्यासाठी रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीसह कोल्हापूर येथील पर्यावरणप्रेमी पुढे सरसावले आहेत. गिरीश कुंभार व विक्रम कुंभार यांना मोटरसायकल घेऊन देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.बेलेवाडी घाटात नवकृष्णा व्हॅली स्कूलजवळ वणवा पेटला होता. त्यावेळी आजरा येथील गिरीश प्रकाश कुंभार ( वय २६) व विक्रम प्रकाश कुंभार (वय २४) हे दोघे सख्खे भाऊ आजऱ्याहून पिंपळगाव येथे नातेवाईकांकडे जात होते. वणवा असाच सुरू राहिला तर जवळ असलेल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरला धोका होता, शॉर्टसर्किटची भीती होती. हे पाहून क्षणाचाही विलंब न करता या दोन भावांनी मोटरसायकल रस्त्याकडेला थांबून आग विझविण्यास सुरुवात केली. विजेच्या ट्रान्सफॉर्मरकडे जाणारी आग विझविण्याच्या प्रयत्न करत असताना आग दुसऱ्या बाजूने येऊन रस्त्यावर उभ्या केलेल्या मोटरसायकलजवळ पोहोचली व त्यात त्यांची मोटरसायकल जळून खाक झाली. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. ही बातमी वाचून कोल्हापूरमधील एव्हरीडे फॉर फ्युचर संस्थेचे नितीन डोईफोडे, प्रशांत कासार यांनी कुंभार यांना मोटरसायकल देण्यासाठी निधी उभारण्याचे ठरविले आहे. चार दिवसांत आपण हा निधी जमा करू, असा विश्वास नितीन डोईफोडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनीही मोटरसायकल खरेदीसाठी दहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले.रवळनाथचा मदतीचा हात कायमगडहिंग्लज येथील श्री रवळनाथ फायनान्स सोसायटी जळीतग्रस्तांना मदतीसाठी कायम पुढे असते. यावेळीसुद्धा संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी कामात व्यस्त असतानाही फोनवरच दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली.गिरीश विज्ञानाचा पदवीधरगिरीश याने आजरा महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी मिळवली आहे. गेली दोन वर्षे तो गोवा येथील खासगी कंपनीत नोकरी करतो. नातेवाईकांना भेटून दोनच दिवसात तो नोकरीवर रुजू होणार होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर