गडहिंग्लजला लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:26+5:302021-05-07T04:24:26+5:30
उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू असल्यामुळे रुग्णालयातील लसीकरण केंद्र एम. आर. हायस्कूलमध्ये हलविण्यात आले. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी ...

गडहिंग्लजला लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड
उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू असल्यामुळे रुग्णालयातील लसीकरण केंद्र एम. आर. हायस्कूलमध्ये हलविण्यात आले. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध असून गुरुवारपासून लसीकरण सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. लस उपलब्ध झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी शहरातील बॅरिस्टर नाथ पै विद्यालय आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावर नागरिक रोज हेलपाटे मारताना दिसत होते. लसीकरण सुरू होणार समजताच एम. आर. हायस्कूलच्या केंद्रावर सकाळी १० वाजता लसीकरण सुरू होण्यापूर्वीच ८ वाजल्यापासूनच नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडवून कोरोनालाच पुन्हा आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला.
लसीकरणासाठी आलेल्या काही नागरिकांनी गर्दी व रांगा पाहूनच घरचा रस्ता धरला.
गुरुवारी केवळ १२० नागरिकांना लस मिळाली. त्यामुळे लसीकरणासाठी गर्दी करून उन्हात रांग लावून थांबलेल्यांना पुन्हा लसीविना माघारी परतावे लागेल.
--------------------------
फोटो ओळी : कोरोनाला अटकाव की आमंत्रण..! कोरोनाला अटकाव करण्यासाठी सध्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, गडहिंग्लजच्या एम. आर. हायस्कूलच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांनी गर्दी करून व सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडवून कोरोनाला एकप्रकारे निमंत्रण दिले. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : ०६०५२०२१-गड-०२