शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हप्ते मागणाऱ्या दोघा तोतया पोलिसांना नागरिकांनी चोपले, शिवाजी पेठेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 18:39 IST

वडापाव विक्रेत्‍याकडे हप्ता मागणाऱ्या तोतया पोलिसांना नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्‍या स्वाधीन केले. हा प्रकार शिवाजी पेठेत विद्यार्थी कामगार चौकात घडला.

ठळक मुद्देहप्ते मागणाऱ्या दोघा तोतया पोलिसांना शिवाजी पेठेतील नागरिकांनी चोपलेवडापाव विक्रेत्‍याकडे हप्‍त्‍याची मागणी; एकाचे पलायन

कोल्हापूर : वडापाव विक्रेत्‍याकडे हप्ता मागणाऱ्या तोतया पोलिसांना नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्‍या स्वाधीन केले. हा प्रकार शिवाजी पेठेत विद्यार्थी कामगार चौकात घडला.

आदर्श अनिल भोसले व वैभव शहाजी कुरणे (दोघे रा. वारे वसाहत) अशी संशयितांची नावे आहेत. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला. संशयित कुरणे याने मारहाण करणाऱ्या नागरिकांच्‍या तावडीतून सुटका करून घेत पलायन केले. पोलीस त्‍याचा शोध घेत आहेत. याबाबत सुजित आनंदराव सुतार (वय ३२, रा. रामानंदनगर) यांनी राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली.याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी पेठ परिसरात संशयित आदर्श भोसले व वैभव कुरणे हे संशयित फिरत होते. सरनाईक कॉलनीत सुजित सुतार हे फर्निचर व्यावसायिक रस्‍त्‍याकडेला थांबले होते. त्याच वेळी संशयित भोसले व कुरणे यांनी तेथे जाऊन त्यांना हटकले, तू इथे काय करतो? आम्‍ही पोलीस आहोत.

आमच्‍यासोबत पोलीस स्‍टेशनला चल,ह्ण असे सांगून त्‍यांनी सुजितला दुचाकीवरून जय भवानी तरुण मंडळाजवळ नेले आणि त्याला लुटण्याचा प्रयत्न केला; पण त्‍याच्‍याजवळ पैसे नसल्‍याचे लक्षात येताच त्‍याला वाटेतच सोडून तोतया पोलीस निघून गेले.याच दोघा तोतया पोलिसांनी विद्यार्थी कामगार चौकात वडापाव विक्रेत्‍याकडेही पैसे मागितले होते, त्यावेळी त्याने ह्यओळखपत्र दाखवाह्ण असे सांगितले. ओळखपत्र नसल्‍याने दोघेही तोतया पोलीस गोंधळून गेले. त्याच वेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना ते दोघे तोतया पोलीस असल्‍याचे लक्षात येताच नागरिकांनी त्या दोघांना बेदम चोप दिला.

दरम्यान, मारहाण सुरू असतानाच वैभव कुरणे हा नागरिकांच्‍या तावडीतून सुटका करून घेऊन पळून गेला. काही वेळात सुजित सुतार हे या रस्‍त्‍यावरून पुढे जाताना त्याला तो तोतया पोलीस नजरेस पडला. त्‍यांना धमकावणारा भामटा असल्‍याचे निदर्शनाला आल्‍याने त्‍यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात भोसले व कुरणे यांच्याविरोधात गुन्‍हा दाखल झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर