शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नागरी बँकांमधील नोकरभरती आता आॅनलाईन- भरतीतील गैरव्यवहारास चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 20:13 IST

राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरतीमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी ही भरती यापुढे आॅनलाईन पद्धतीनेच करणे बंधनकारक असल्याचा आदेश सहकार विभागाने सोमवारी काढला. बँकिंग क्षेत्रातील बदलती

ठळक मुद्देसहकार विभागाचा आदेश - बँंकाबाबत विश्वास वाढण्यास मदत

विश्वास पाटील ।कोल्हापूर : राज्यातील नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरतीमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी ही भरती यापुढे आॅनलाईन पद्धतीनेच करणे बंधनकारक असल्याचा आदेश सहकार विभागाने सोमवारी काढला. बँकिंग क्षेत्रातील बदलती स्थिती, तांत्रिकदृष्ट्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता व स्पर्धात्मक बँकिंगसाठी गुणवत्तापूर्ण कर्मचारी वर्ग उपलब्ध व्हावा, हा या निर्णयामागे हेतू असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. नागरी बँकांतून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या एकूण अर्थकारणांमध्ये आणि विकासामध्येही राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत नागरी सहकारी बँकांचा वाटा नेहमीच मोठा राहिला आहे. आजही या बँकांच सर्वसामान्य कर्जदार व ठेवीदार यांनाही जवळच्या वाटतात. १00 वर्षांचा उज्ज्वल इतिहास व पारदर्शक कारभार असणाऱ्या कित्येक बँका आहेत. या बँकांमधील नोकरभरती सध्या त्या त्या बँकेच्या नियमानुसार होते. तिला एकत्रित अशी काही सिस्टम किंवा नियमावली नाही. निश्चित स्टाफिं ग पॅटर्नही पाळला जात नाही. अनेकदा गुणवत्तेपेक्षा संचालकांशी लागेबांधे असणारे लोकच कर्मचारी म्हणून निवडले जातात व ही निवड होतानाही आर्थिक व्यवहार होतात; त्यामुळे असा वशिल्यातून नियुक्त झालेला स्टाफ असेल, तर तो तज्ज्ञ, प्रशिक्षित व गुणवत्तेचा नसतो.त्याअनुषंगाने काही तक्रारी सरकारकडेही झाल्या आहेत. म्हणून नोकरभरती पारदर्शक व्हावी, यासाठी ती आॅनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

ही भरती करताना बँकेला स्वत: अडचणी येऊ शकतात, त्यासाठी इंडियन बँकिंग पर्सनल मॅनेजमेंट सिलेक्शन बोर्ड, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ को-आॅपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ बँकिंग अ‍ॅन्ड फायनान्स मुंबई, धनंजराव गाडगीळ प्रबंध संस्था नागपूर किंवा बँकिंग भरती परीक्षा घेणाºया तत्सम संस्थांसाठी या प्रक्रिया राबविण्यात याव्यात. मुलाखतीसाठी आॅनलाईन परीक्षा व मौखिक परीक्षेसाठी गुणांचे प्रमाण ९० : १० असे ठेवण्यात यावे, असेही या आदेशात म्हटले आहे.दृष्टिक्षेपात महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकाएकूण बँका : ५०८सभासद : ७६ लाख २२ हजारठेवी : ६९ लाख ४४ हजार ४३९ लाखकर्जे : ४० लाख ७७ हजार ९०० लाख(स्त्रोत : सहकार आयुक्त कार्यालय) 

सरकारचा निर्णय चांगला आहे; त्यामुळे नागरी बँकांमध्ये मेरिटनुसार सेवकभरती होईल. त्यातून या बँकांमध्ये व्यावसायिकता वाढीस लागेल व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सग्यासोयºयांची भरतीस त्यास चाप बसून विश्वास वाढीस लागेल. - विद्याधर अनासकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नागरी बँक्स असो.सहकार विभागाने घेतलेला निर्णय चांगला आहे. मी स्वत:ही याच पद्धतीने नोकरभरती व्हायला हवी, यासाठी आग्रही आहे. आॅनलाईन भरतीमुळे चांगला स्टाफ नियुक्त केला जाईल व त्याचा बँकेच्या कारभारात उपयोग होईल. - अनिल निगडे, अध्यक्ष, शतकमहोत्सवी कोल्हापूर अर्बन को-आॅप. बँक, कोल्हापूर

टॅग्स :bankबँकonlineऑनलाइन