‘रवळनाथ हौसिंग फायनान्स""च्या अध्यक्षपदी चौगुले यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:47+5:302021-01-08T05:22:47+5:30

उपाध्यक्षपदासाठी प्रा. मायदेव यांचे नाव प्रा. विजयकुमार घुगरे यांनी सुचविले. त्याला प्राचार्य मीना रिंगणे यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर नूतन ...

Chowgule elected chairman of Ravalnath Housing Finance | ‘रवळनाथ हौसिंग फायनान्स""च्या अध्यक्षपदी चौगुले यांची निवड

‘रवळनाथ हौसिंग फायनान्स""च्या अध्यक्षपदी चौगुले यांची निवड

उपाध्यक्षपदासाठी प्रा. मायदेव यांचे नाव प्रा. विजयकुमार घुगरे यांनी सुचविले. त्याला प्राचार्य मीना रिंगणे यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर नूतन पदाधिकारी व संचालकांचा कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी उपाध्यक्ष प्रा. मायदेव, संचालक प्राचार्य निळपणकर, प्रा. किरण पोतदार, प्राचार्या मीना रिंगणे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सहायक निवडणूक अधिकारी रमेश चव्हाण, संचालक डॉ. संजय चौगुले, सुशांत करोशे, महेश मजती, प्रा. दत्ता पाटील यांच्यासह जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड, शाखाधिकारी अशोक सुळकुडे व कर्मचारी उपस्थित होते.

सीईओ दत्तात्रय मायदेव यांनी स्वागत केले. प्रशासन अधिकारी सागर माने यांनी सूत्रसंचालन केले. व्यवस्थापक शिवानंद घुगरे यांनी आभार मानले.

------------------------------

* संस्थापकांचा संकल्प..!

२०२५ पर्यंत १२ हजार सभासद, ५०० कोटींच्या ठेवींचे संकलन, ३५० कोटींचे कर्ज वितरण, नवीन चार शाखा सुरू करणे आणि एकूण ग्राहक संख्या २५ हजारांपर्यंत नेण्याचा संकल्प संस्थापक अध्यक्ष चौगुले यांनी जाहीर केला.

* एम. एल. चौगुले : ०७०१२०२१-गड-०२

* वासुदेव मायदेव : ०७०१२०२१-गड-०३

* जाहिरातदार संस्था बातमी फोटोसह कोल्हापूर शहर व जिल्हा दोनही आवृत्तीत वापरावी ही विनंती.

Web Title: Chowgule elected chairman of Ravalnath Housing Finance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.