चौगुले नागरी संस्था ग्राहक सेवेसाठी सदैव तत्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST2021-08-20T04:28:29+5:302021-08-20T04:28:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कळे : सामाजिक, शैक्षणिक कार्याचा वसा घेऊन आमची पतसंस्था विश्वासपूर्ण ग्राहक सेवेसाठी सदैव ...

चौगुले नागरी संस्था ग्राहक सेवेसाठी सदैव तत्पर
लोकमत न्यूज नेटवर्क
कळे :
सामाजिक, शैक्षणिक कार्याचा वसा घेऊन आमची पतसंस्था विश्वासपूर्ण ग्राहक सेवेसाठी सदैव तत्पर आहे. कळे विभागातील ग्राहकांनी संस्थेच्या विविध बँकिंग सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन अनिल आपगोंडा पाटील यांनी केले. कळे (ता. पन्हाळा ) येथे श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या १९ व्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन सुमित चौगुले, संचालक सुजय होसमनी, प्रवीण पाटील, अमरनाथ गाताडे, अभिजित मणियार, अरुण बहिरशेठ, बाजीराव रावण, श्रीकांत नागवेकर, असि. जनरल मॅनेजर तुकाराम पाटील, शशिकांत मोरे, वसंत चव्हाण, शाखाधिकारी चंद्रकांत कातळे, कळेचे सरपंच सुभाष पाटील, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन रंगराव मोळे , गगनबावडाचे माजी सभापती एकनाथ शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मोळे, कुंभी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन निवास वातकर, वसंत पाटील आदी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक जनरल मॅनेजर एम. एस. पाटील यांनी केले, तर आभार शाखाधिकारी चंद्रकांत नारायण कातळे यांनी मानले.
सोबत फोटो मेल
१९ कळे चौगुले संस्था
फोटो ओळ : कळे ( ता. पन्हाळा ) येथे श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या १९ व्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेचे चेअरमन अनिल आपगोंडा पाटील. सोबत संस्थेचे व्हा. चेअरमन सुमित चौगुले, कळेचे सरपंच सुभाष पाटील, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन रंगराव मोळे , माजी सभापती एकनाथ शिंदे, जनरल मॅनेजर एम. एस. पाटील व मान्यवर.