जोतिबा येथे शुक्रवारी चोपडाई षष्ठी यात्रा
By Admin | Updated: July 29, 2014 23:04 IST2014-07-29T21:09:39+5:302014-07-29T23:04:12+5:30
शासकीय नियोजन बैठक : यात्रेची जय्यत तयारी

जोतिबा येथे शुक्रवारी चोपडाई षष्ठी यात्रा
जोतिबा : तीर्थक्षेत्र जोतिबा डोंगरावर शुक्रवारी (दि. १ आॅगस्ट) श्री चोपडाई देवीची षष्ठी यात्रा भरणार आहे. यात्रेच्या पूर्व नियोजनाची तयारी जोरात सुरू असून, शासकीय अधिकाऱ्यांची यात्रा नियोजन बैठक पन्हाळा येथे घेण्यात आली.
या शासकीय बैठकीमध्ये यात्रा काळात वीज, पाणी, वाहतूक, स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी चर्चा करण्यात
आली. यात्रा काळात घाट मार्गातून एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. कार पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. जोतिबा ग्रामपंचायतीने मुबलक पाणीपुरवठा व स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी सर्व यंत्रणा
कामाला लावली आहे. देवस्थान समितीने मंदिरातील विद्युत यंत्रणा, दर्शन रांग व्यवस्था, स्वच्छता करण्यासाठी कर्मचाऱ्यांमार्फत कामाला सुरुवात केली आहे. स्थानिक पुजारी वर्ग घर सजावट, द्रोण-पत्रावळी खरेदीमध्ये व्यस्त आहेत. व्यापारी वर्गाने गुलाल-
खोबरे, मिठाईची खरेदी करून साहित्याची मांडणी करण्यास सुरुवात केली आहे. षष्ठी यात्रेला नारळ-लिंबू यांची विक्री मोठ्या प्रमाणात
होते. त्यामुळे याचीही आवक वाढली आहे. (वार्ताहर)
श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर १ आॅगस्ट (शुक्रवार) हा षष्ठी यात्रेचा मुख्य दिवस आहे. षष्ठीचा उपवास शुक्रवारचा आहे. नागपंचमी व षष्ठी यात्रा एकाच दिवशी आली आहे. या यात्रेला मुंबई येथील भाविकांची लक्षणीय गर्दी असते. शुक्रवारी रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. शनिवारी सकाळी ६ वाजता धुपारती सोहळ्याने यात्रेची सांगता होणार आहे.