गावच्या विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:40+5:302021-01-08T05:17:40+5:30
बोरवडे : ग्रामपंचायत निवडणुका जवळ आल्या आहेत. यासाठी नेतेमंडळी विविध आमिषे दाखवतील पैशाच्या व इतर कोणत्याही आमिषाला बळी न ...

गावच्या विकासासाठी योग्य उमेदवाराची निवड करा
बोरवडे : ग्रामपंचायत निवडणुका जवळ आल्या आहेत. यासाठी नेतेमंडळी विविध आमिषे दाखवतील पैशाच्या व इतर कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपले पवित्र मत विकू नका. गावच्या विकासासाठी उच्चशिक्षित व विकासाभिमुख उमेदवाराची निवड करा, संतांचे विचार आचरणात आणून जीवन सुसंस्कारी बनवा, असे प्रतिपादन मन मंदिरा - गजर भक्तीचा फेम व कीर्तनकार ह.भ.प शिवलीला पाटील यांनी केले. बोरवडे (ता. कागल) येथे सन्मित्र मंडळाने आयोजित केलेल्या कीर्तन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. पाटील म्हणाल्या, पैशापेक्षा संस्कारीत मुले हीच खरी आई-वडिलांची संपत्ती असते. व्यसनाच्या आहारी जाऊन मरण्यापेक्षा देशासाठी बलिदान देऊन हुतात्मा होणे कधीही चांगले. सरपंच व बिद्री साखर कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे व जोतीराम खाडे यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन केले.
फोटो ओळी - बोरवडे (ता. कागल) येथे कीर्तन सोहळ्याप्रसंगी बोलताना युवा महिला कीर्तनकार शिवलीला पाटील. समोर उपस्थित जनसमुदाय.