चकोते स्कूलच्या दिव्याची ‘सारेगमप’मध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST2021-06-22T04:17:28+5:302021-06-22T04:17:28+5:30

जयसिंगपूर : आण्णासाहेब बाळासाहेब चकोते इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी दिव्या प्रदीप मगदूम हिची झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटल चॅम्पस्’ स्पर्धेसाठी ...

Choice of Chakote school lamp in 'Saregampu' | चकोते स्कूलच्या दिव्याची ‘सारेगमप’मध्ये निवड

चकोते स्कूलच्या दिव्याची ‘सारेगमप’मध्ये निवड

जयसिंगपूर : आण्णासाहेब बाळासाहेब चकोते इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी दिव्या प्रदीप मगदूम हिची झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटल चॅम्पस्’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमधून निवड झालेली दिव्या ही एकमेव स्पर्धक आहे. या यशाने चकोते स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खाेवला गेला आहे.

दिव्याच्या कलेला चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आण्णासाहेब चकोते यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या सहकार्याने दिव्याचे एक अल्बम गीतसुध्दा प्रदर्शित झाले आहे. दिव्याला मराठी आणि हिंदी फिल्मसृष्टीमधील एक उत्कृष्ट गायिका बनलेली पाहायचा चकोते यांचा मानस आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची त्यांनी तयारी केली आहे. दिव्याच्या यशामध्ये तिचे वडील प्रदीप मगदूम, डॉ. दत्तात्रय कुंभार, अभिषेक काळे यांच्यासह संस्थेचे सचिव बाळासाहेब चकोते, शिक्षकांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन याचा समावेश आहे.

फोटो - २१०६२०२१-जेएवाय-०७-दिव्या मगदूम

Web Title: Choice of Chakote school lamp in 'Saregampu'