इंजेवाडा शिवारात चितळ मृतावस्थेत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 00:35 IST2017-02-17T00:35:40+5:302017-02-17T00:35:40+5:30
तालुक्यातील इंजेवाडा शिवारात दोन वर्षीय चितळ मृतावस्थेत आढळला. ती मादा होती. गावात चर्चेला उधाण

इंजेवाडा शिवारात चितळ मृतावस्थेत आढळला
इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगाच्या ऊर्जितावस्थेसाठी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मुंबई येथे मंत्रालयात ताबडतोब बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी यंत्रमागधारकांच्या शिष्टमंडळाला दिली.
वस्त्रोद्योगातील यंत्रमाग उद्योग आर्थिक मंदीच्या भोवऱ्यात सापडला आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या या उद्योगाला सरकारने मदत करून त्याला ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी म्हणून ‘मी स्वाभिमानी कारखानदार’ संघटनेच्यावतीने दीड महिन्यांपूर्वी नऊ दिवसांचे उपोषण झाले. त्यावेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणाची सांगता केली. या उद्योगासाठी नजीकच्या दोन-तीन आठवड्यांत शासन ठोस उपाययोजना करेल, असे राज्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र, अद्याप शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नसल्यामुळे गुरुवारी कोरोची (ता. हातकणंगले) येथे मुख्यमंत्री फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्याच्या तयारीसाठी बुधवारी यंत्रमागधारकांचा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याला परवानगी नाकारून प्रशासन व पोलिसांनी यंत्रमागधारकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले होते.
गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अतिग्रे येथील घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात मुख्यमंत्री व ‘मी स्वाभिमानी कारखानदार’ संघटनेचे पदाधिकारी यांची भेट झाली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, पोलिस निरीक्षक सतीश पवार, संघटनेचे विकास चौगुले, अमोद म्हेत्तर, आदी उपस्थित होते. संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये, यंत्रमागासाठी प्रतियुनिट १ रुपये ६६ पैसे दराने वीज, यंत्रमाग उद्योगाच्या कर्जावर पाच टक्के व्याज सवलत, यंत्रमागाच्या आधुनिकीकरणासाठी प्रतिलूम ५० हजार रुपयांचे अनुदान, सुताच्या पॅकिंगवर कमाल किंमत छापून सूत दर पंधरा दिवस स्थिर ठेवावेत आणि केंद्र सरकारचे टफ्स अनुदान लवकरात लवकर मिळावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली आणि निवडणुका संपल्यानंतर मंत्रालयात व्यापक बैठक घेऊन यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी शासन निर्णय घेईल, असे सांगितले.
५अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये यंत्रमागधारकांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना अरविंद देवकर. यावेळी विकास चौगुले, अमोद म्हेत्तर, जनार्दन चौगुले, अनिल मैत्री, प्रकाश म्हेत्तर, आदी उपस्थित होते.