चोरीप्रकरणी चिपरीचा युवक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:22 IST2020-12-08T04:22:07+5:302020-12-08T04:22:07+5:30

जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथे घरातून वीस हजार रुपये किंमतीची सोन्याची बोरमाळ चोरल्याप्रकरणी राकेश हिम्मत कांबळे (वय १९) ...

Chipri's youth arrested in theft case | चोरीप्रकरणी चिपरीचा युवक गजाआड

चोरीप्रकरणी चिपरीचा युवक गजाआड

जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथे घरातून वीस हजार रुपये किंमतीची सोन्याची बोरमाळ चोरल्याप्रकरणी राकेश हिम्मत कांबळे (वय १९) याला जयसिंगपूर पोलिसांनी गजाआड केले. याबाबतची तक्रार कमल कांबळे यांनी दिली होती. पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत चोरीचा छडा लावला असून तक्रारदार यांच्या घराशेजारीच राहणारा हा संशयित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार कांबळे यांच्या घरातील पत्र्याच्या डब्यातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची बोरमाळ अज्ञाताने चोरून नेली होती. याबाबत पोलिसांनी तपास यंत्रणा कामाला लावली होती. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरुन संशयित राकेश कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. यावेळी त्याने चोरीची कबुली दिली. त्याचेकडून सोन्याची बोरमाळ पोलिसांनी हस्तगत करून त्याला गजाआड केले. या गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजने, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गुलाब सनदी, सचिन निकम, बाळासाहेब चव्हाण, सागर सूर्यवंशी, जावेद पठाण यांच्यासह पथकाने केली.

फोटो - ०७१२२०२०-जेएवाय-०६-संशयीत राकेश कांबळे

Web Title: Chipri's youth arrested in theft case