शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या ‘फौंड्री’ला चिनी हाय प्रेशर मोल्डिंग मशीनचे आता बळ; युरोपसह जपानच्या महागड्या मशीनला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:05 IST

स्वस्त आणि अधिक उत्पादनक्षम असल्याने कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला गती येणार

कोल्हापूर : भारतातील फौंड्री उद्योगाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी चिनी कंपन्यांची मदत घेतली जात आहे. शिरोली एमआयडीसी येथील तरुण उद्योजकांनी चीनमधील कंपन्यांशी करार केला असून, त्यातून कोल्हापूरला हायप्रेशर मोल्डिंग मशीन मिळणार आहेत. युरोप आणि जपानी मशीनच्या तुलनेत चिनी मशीन स्वस्त आणि अधिक उत्पादनक्षम असल्याने कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला गती येणार असल्याचा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला.कोल्हापूरचा फौंड्री उद्योग अलीकडे गतीने वाढत आहे. यात ॲटो सेक्टरमधील विविध प्रकारचे पार्ट तयार करण्यासाठी मोल्डिंग मशीनचा वापर केला जातो. यासाठी युरोपीय देशांसह जपानमधून आयात केलेल्या मोल्डिंग मशीनचा वापर केला जातो. मात्र, या मशीन महागड्या असल्याने छोट्या कंपन्यांना परवडत नाहीत.शिरोली एमआयडीसीमधील विजय फौंड्री इक्विपमेंट या कंपनीने चिनी मशीनचा पर्याय शोधला आहे. चिनी कंपन्यांशी करार केला असून, स्थानिक फौंड्री उत्पादकांना अत्याधुनिक मशीनचा पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती विजय फाऊंड्री एक्विपमेंटचे प्रमुख विजय पवार यांनी दिली.उत्पादनांचा दर्जा वाढणारइतर देशांच्या तुलनेत चिनी बनावटीचे हाय प्रेशर मोल्डिंग मशीन अत्याधुनिक आहे. त्याची कार्यक्षमता जास्त आहे. दर्जा आणि गुणवत्तेतही ते कमी नाही. यामुळे कोल्हापूरच्या फाऊंड्री उत्पादनांचा दर्जा वाढणार आहे. छोट्या उद्योजकांनाही ते परवडणारे असल्याने जिल्ह्यातील फाऊंड्रीचा विस्तार होण्यास मदत होईल, असा विश्वास उद्योजक पवार यांनी व्यक्त केला.

हाय प्रेशर मोल्डिंग मशीन पूर्णत: स्वयंचलित आहे. त्याची उत्पादनक्षमता आणि टिकाऊपणा चांगला आहे. त्यामुळे भारतासह कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला नवसंजीवनी मिळेल. चिनी कंपनीशी करार करताच कोल्हापुरातील नामांकित पाच कंपन्यांनी हाय प्रेशर मोल्डिंग मशीनची मागणी नोंदवली आहे. - विजय पवार - उद्योजक