चिंचवाडच्या बालकाचा अपघातात मृत्यू

By Admin | Updated: June 19, 2016 01:11 IST2016-06-19T01:11:27+5:302016-06-19T01:11:27+5:30

धडक बसल्याने दोघेजण गंभीर जखमी

Chinchwad's child dies in accident | चिंचवाडच्या बालकाचा अपघातात मृत्यू

चिंचवाडच्या बालकाचा अपघातात मृत्यू

जयसिंगपूर : नांदणी (ता़ शिरोळ) येथे कारच्या धडकेत हर्षद सागर चौगुले (वय ७, रा़ चिंचवाड, ता़ शिरोळ) या बालकाचा मृत्यू झाला़ या धडकेत सुजल सचिन उळकाटे (१०, रा़ नांदणी) हा बालक जखमी झाला आहे़ ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली़ पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, हर्षद हा आपल्या आई-वडिलांसमवेत नांदणी येथे लग्नाच्या समारंभाला आला होता़ दरम्यान, दुपारी साडेबाराच्या सुमारास हर्षद काही मुलांसमवेत खेळत असताना हुदाई वेरना कार (क्ऱ एमएच ११ ए के०९०९) या वाहनाच्या पुढील बाजूने हर्षद व सुजलला धडक बसल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले़ त्यांच्यावर जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते़ मात्र, सायंकाळी चारच्या सुमारास उपचारादरम्यान हर्षदचा मृत्यू झाला.

Web Title: Chinchwad's child dies in accident