रेबीजमुळे दानोळीतील चिमुरड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:25 IST2020-12-22T04:25:08+5:302020-12-22T04:25:08+5:30

३० नोव्हेंबरला युवराज राहुल तोंदले हा चिमुकला घराशेजारील बिरदेवमंदिर शेजारी खेळत असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करून त्याच्या ...

Chimurda dies of rabies | रेबीजमुळे दानोळीतील चिमुरड्याचा मृत्यू

रेबीजमुळे दानोळीतील चिमुरड्याचा मृत्यू

३० नोव्हेंबरला युवराज राहुल तोंदले हा चिमुकला घराशेजारील बिरदेवमंदिर शेजारी खेळत असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करून त्याच्या हाताचे लचके तोडले. जखमी युवराजला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर औषधोपचार करून त्याला अँटीरेबिजचे इंजेक्शन देण्यात आले. दरम्यान, १८ तारखेला त्याला ताप आल्याने सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

युवराजला रेबिजची लागण झाल्याची लक्षणे दिसून आल्याने रविवारी त्याला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हीलमध्ये दाखल करून रेबिज सेंटमध्ये ठेवण्यात आले. सोमवारी दिवसभर अंधाऱ्या खोलीतून हृदय पिळवटून टाकणारा आवाज येत होता त्यातच रात्री त्याचा मृत्यू झाला. युवराजच्या या मृत्यूने दानोळी गावात शोककळा पसरली आहे.

२१ युवराज तोंदले डेथ

Web Title: Chimurda dies of rabies