शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गडहिंग्लज बाजारात मिरची कडाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:44 IST

Mraket Kolhapur- गडहिंग्लज बाजार समिती आवारात मिरची आवक सुरू झाली आहे. चालूवर्षी संकेश्वरी (जवारी) मिरचीबरोबरच ब्याडगी मिरचीनेही दरात मुसंडी मारली आहे. संकेश्वरी मिरचीचा दर सद्या ५०० पासून १२०० रूपये प्रतिकिलो सुरू आहे. मात्र, यंदा हंगामाच्या सुरूवातीलाच ब्याडगीने ३८० ते ४३२ रूपये प्रतिकिलो दर गाठला आहे. गेल्या ३० वर्षात ब्याडगी मिरचीने प्रथमच उच्चांकी दर गाठला आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लज बाजारात मिरची कडाडलीजवारी १२०० तर ब्याडगी ४३० रूपये प्रतिकिलो

गडहिंग्लज : गडहिंग्लज बाजार समिती आवारात मिरची आवक सुरू झाली आहे. चालूवर्षी संकेश्वरी (जवारी) मिरचीबरोबरच ब्याडगी मिरचीनेही दरात मुसंडी मारली आहे. संकेश्वरी मिरचीचा दर सद्या ५०० पासून १२०० रूपये प्रतिकिलो सुरू आहे. मात्र, यंदा हंगामाच्या सुरूवातीलाच ब्याडगीने ३८० ते ४३२ रूपये प्रतिकिलो दर गाठला आहे. गेल्या ३० वर्षात ब्याडगी मिरचीने प्रथमच उच्चांकी दर गाठला आहे.मान्सूनची दमदार सुरूवात आणि परतीच्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हुकमी पिक मिरची शेतातच गारठल्याने यंदा मिरचीचा दरही भडकणार आहे. त्यामुळे कांद्यापाठोपाठ मिरचीनेही ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणण्यास सुरूवात केली आहे.सध्या बाजारात आवक झालेल्या मिरच्या व दर प्रतिक्विंटल कंसात - काश्मीर ब्याडगी मिरची ( नं. १ - ३८००० ते ४३२००, नं. २ - ३३००० ते ३८०००), ब्याडगी मिरची (नं. १ - ३०००० ते ३६५००, नं.२ -२६००० ते २८५००), सिजंटा ब्याडगी ( नं.१- २७००० ते ३१५००, नं.२ - २०००० ते २२५००), गरूडा तिखट मिरची - (१३५०० ते १६५००), लाली ब्याडगी (१६००० ते १९०००), पांढरी मिरची ( १५०० ते २५००), ब्याडगी मध्यम (१२००० ते १६०००)ग्राहक वेट अ‍ॅण्ड वॉचमध्ये जवारीसह ब्याडगी, गरूडा, सिजंटा, पांढरी मिरची, लाली ब्याडगी यांचाही दर यंदा जवळपास १५० पासून पुढे असल्याने ग्राहक केवळ विचारपूस करून माघारी परतत आहेत. मात्र, यंदा व्यापाऱ्यांकडेही अल्पप्रमाणात आवक होत असल्याने आलेला माल मुंबई, पुणेसह अन्य राज्यात निर्यात केला जात आहे. त्यामुळे वेट अ‍ॅण्ड वॉचमध्ये असलेल्या स्थानिक नागरिकांना मिरचीसाठी गतवर्षीप्रमाणे आणखी कांही दिवसानंतर यापेक्षाही अधिक दर मोजावे लागण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर