ट्रॅक्टरखाली सापडून बालकाचा मृत्यू

By Admin | Updated: March 13, 2016 01:14 IST2016-03-13T01:14:48+5:302016-03-13T01:14:48+5:30

ट्रॅक्टर बाजूला घेत असताना मागील चाकाखाली पार्थ सापडला

Child's death by trafficking under tractor | ट्रॅक्टरखाली सापडून बालकाचा मृत्यू

ट्रॅक्टरखाली सापडून बालकाचा मृत्यू

गारगोटी : कूर (ता. भुदरगड ) येथे गारगोटी-कोल्हापूर रस्त्यावर ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली सापडून पार्थ तानाजी परीट (वय २ वर्षे) हा बालक ठार झाले. या अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद सुरू होती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : कूर येथे गारगोटी-कोल्हापूर मार्गालगत तानाजी परीट यांचे घर आहे. पती-पत्नी मोलमजुरी करतात. शनिवारी सकाळी अकरा वाजता दोघेही कामासाठी बाहेर पडले. संध्याकाळी सहाच्या सुमारास मडिलगे येथून उसाचे वजन करण्यासाठी ट्रॅक्टर मुदाळतिट्ट्याकडे चालला होता. पार्थ हा खेळता खेळता अचानक रस्त्यावर येत असल्याचे ट्रॅक्टरचालक विकास माने याच्या नजरेस आले. त्याला चुकवून ट्रॅक्टर बाजूला घेत असताना समोरून सुमो कार आली. या गाडीला ट्रॅक्टरची धडक बसली व ट्रॅक्टरचे पुढील चाक तुटले आणि ट्रॅक्टर मागे सरकला. यावेळी ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली पार्थ सापडला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Child's death by trafficking under tractor