पर्यावरण जागृतीसाठी मुलांचा आज जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:29+5:302021-09-26T04:27:29+5:30
युनिसेफच्या अहवालानुसार ८५ कोटी मुले वणवा, ढगफुटी, चक्रीवादळ अशा संकटांनी घेरलेली आहेत. त्यामुळे पर्यावरण जागृती करण्यासाठी जगभरातील लहान मुले ...

पर्यावरण जागृतीसाठी मुलांचा आज जागर
युनिसेफच्या अहवालानुसार ८५ कोटी मुले वणवा, ढगफुटी, चक्रीवादळ अशा संकटांनी घेरलेली आहेत. त्यामुळे पर्यावरण जागृती करण्यासाठी जगभरातील लहान मुले व तरुण एकवटले आहेत. त्यासाठी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पर्यावरणासाठी आंदोलन केले जाते. याअंतर्गत ८ ते १८ वयोगटातील मुले जनतेशी संवाद साधणार आहेत. तरी नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्स, स्वयंप्रभा मंच, कोल्हापूर अर्थवॉरीअर्स या संस्थांनी केले आहे.
----
अजित गोंधळी यांना पुरस्कार
कोल्हापूर : पुण्यातील आर्ट बिटस फौंडेशनच्यावतीने मुडशिंगी चित्रकार व गायक अजित गाेंधळी यांना चित्रकला, संगीत या विभागातील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. गोंधळी यांनी चित्रकलेत अनेक पुरस्कार मिळविले आहेत. गायन क्षेत्रातील कोणताही वारसा नसताना शास्त्रीय संगीतात यश मिळवले आहे. आर्टस बिटस या संस्थेतर्फे कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी असे उपक्रम राबविले जातात.
--
फोटो नं २५०९२०२१-कोल-अजित गोंधळी
---