शहरं
Join us  
Trending Stories
1
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
2
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
3
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
4
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
5
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
6
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
7
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
8
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
9
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
10
पहिली स्लीपर वंदे भारत धावणार; कती असेल भाडे?
11
जागावाटपाच्या स्वार्थात सर्वच पक्षांना जाहीरनाम्यांचा विसर? 
12
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
13
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
14
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
15
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
16
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
17
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
18
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
19
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
20
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
Daily Top 2Weekly Top 5

‘आता आमचेही ऐका’तून बालकांचे कलाविष्कार

By admin | Updated: March 8, 2017 00:49 IST

रंगतदार कार्यक्रम : वीटभट्टी, ऊसतोड, भंगारवेचक कुटुंबांतील मुलांनी सादर केली कला

कोल्हापूर : ‘दंगल’ चित्रपटातील ‘बापू सेहत के लिए’ यासह ‘मराठमोळं गाणं’ अशा अप्रतिम गीतांवर वीटभट्टी, ऊसतोड व भंगारवेचक कुटुंबातील मुलांनी आपली कला सादर केली. निमित्त होतं ‘अवनि’ आयोजित स्वाभिमानी बालहक्क अभियान व बाल अधिकार मंच यांच्या वतीने ‘आता आमचेही ऐका’ या कार्यक्रमाचे. मंगळवारी शाहू स्मारक भवनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. कुणाल खेमनार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा न्यायाधीश वृषाली जोशी, संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्रिया चोरगे, आदींच्या उपस्थितीत सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा तसेच महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांतून स्थलांतरित होणाऱ्या वीटभट्टी, ऊसतोडणी व बांधकाम क्षेत्रातील मजुरांच्या मुलांसाठी व भंगारवेचक बालकांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी ही संस्था काम करते. यावर आधारित ‘आता आमचेही ऐका’ या कार्यक्रमातून या मुलामुलींनी त्यांचे प्रश्न मांडले.वीटभट्टी कामगारांच्या मुलांनी बालकामगारांंचे जीवन नृत्यातून तसेच अशा बालकामगारांना शिक्षणाची गरज किती आहे हे मूकनाट्याच्या माध्यमातून सादर केले.बालगृहातील मुलांनी ‘सर्वधर्म समभाव’ या नाटकाचे सादरीकरण करून सर्व धर्मांचे विचार एक असून सर्व बांधवांनी गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे, हा संदेश यातूून दिला . त्याचप्रमाणे देशभक्तिपर, शैक्षणिक गीताचे सादरीकरण केले. ‘राधे-राधे श्याम’,‘देश है रंगीला’, ‘चला मुलांनो, चांदोबाची शाळा’ या गीतासह कोळीगीत सादर केले. त्याचबरोबर ‘मुली वाचवा’ हा संदेश देत ‘सेव्ह द बेबी गर्ल’ यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. अवनि संस्थेमधील मुलांच्या सहभागातून हा कार्यक्रम साकारला होता. या कार्यक्रमातून बालकलाकारांनी उपस्थितांची मने जिंकून वाहवा मिळवली.समाजातील अशा वंचित घटकांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तयार असल्याचे यावेळी कुणाल खेमनार, संजय शिंदे यांनी सांगितले. सायली मिसाळ, अस्मिता भोसले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले, अरुण चव्हाण, दिलीप पाटील, आर. वाय. पाटील, संजय पाटील यांच्यासह वनिता कांबळे, सुनीता भोसले, अमोल कवाळे, अमर कांबळे, पुष्पा शिंदे उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष साताप्पा मोहिते, जिल्हा समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर यांनी संयोजन केले. सोनालिका पोवार हिने आभार मानले.