बालचमूंनी लुटला ख्रिसमस पार्टीचा आनंद
By Admin | Updated: December 26, 2014 00:06 IST2014-12-25T23:34:57+5:302014-12-26T00:06:04+5:30
शेकडो बालकांनी ख्रिसमस पार्टीचा मनसोक्त आनंद लुटला़. लोकमत बाल विकास मंचने बालचमूंसाठी ख्रिसमस पार्टी आणि २०१४-१५ चा लकी ड्रॉ आयोजित केला होता़

बालचमूंनी लुटला ख्रिसमस पार्टीचा आनंद
कोल्हापूर : लोकमत बाल विकास मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रॉक आॅन ख्रिसमस पार्टीमध्ये शहरातील बालचमूंनी आज, गुरुवारी अभूतपूर्व जल्लोष अनुभवला़ विनोदी किस्से, गाण्यांचा ठेक्यावरचा ताल, विविध प्रकारचे स्पॉट गेम, संगीत खुर्ची अन अभिनयाच्या आणि प्राण्यांच्या आवाजाच्या नकला यांमुळे कमला कॉलेज येथील व्ही़ टी़ पाटील सभागृहामध्ये शेकडो बालकांनी ख्रिसमस पार्टीचा मनसोक्त आनंद लुटला़. लोकमत बाल विकास मंचने बालचमूंसाठी ख्रिसमस पार्टी आणि २०१४-१५ चा लकी ड्रॉ आयोजित केला होता़
रॉयल ब्लू मल्टिट्रेड प्रा़ लि़, प्रोफेशनल टेक सोल्युशन प्रा़ लि़, बालाजी कलेक्शन, लकी फ र्निचर, राजाकाका ई-मॉल, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क, मत्स्यगंधा अॅक्वाटिक्स, वर्ड पॉवर, राजमंदिर आइस्क्रीम तसेच आदर्श शूज आणि स्पाज टुर्स हे लोकमत बाल विकास मंच २०१४-१५ च्या लकी ड्रॉचे प्रायोजक होते़ त्यांच्या हस्ते प्रायोजकांच्या हस्ते २०१४-१५ चा लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला़
यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मनोज कोळेकर, प्रसाद कामत, मनाली गायकवाड, आदिती पवार, सुनीता डोईफ ोडे, ज्ञानेश्वर डोईफोडे, मयूर भलानी, सारिका भलानी, शोभा पटेल, प्रकाश पोकळे़, रवी बिरादार, दीपक केशवाणी, देवेंद्र चौगुले यांच्या हस्ते लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला़
विजेत्यांची नावे, बक्षिसे अशी, प्राजक्ता सूर्यवंशी (आऱ ओ़ सिस्टीम), प्रणव पाटील, शौर्य राऊत (कलर लेझर प्रिंटर), श्रुती ताकमारे, केदार इंजर, रोशन पाटील, सोहम् भालेराव, पृथ्वीराज सूर्यवंशी (शॉपिंग व्हौचर), रिद्धी शेट्टी, प्रतीक जाधव, अभिषेक काळेकर, संजना लोखंडे, (स्टडी टेबल), पूर्वा मगदूम, स्नेहा पाटील, दर्शन खोत (इंडक्शन), ओंकार पाटील, सोनाली वाघमारे, प्राजक्ता जाधव, कॅँुवरजित यादव, क्षितीज वठारे, (ड्रीमवर्ल्ड एंट्री पास), उत्कर्षा शिं
दे, अंकिता सुतार, श्रुती पोतदार, व्यंकटेश पाटील, सिद्धी साळोखे, प्राजक्ता कुलकर्णी, पार्श्व पाटील, हरिओम राउत, ऋ तुराज बसरे, अथर्व पेटकर (आइस्क्रीम). अभिषेक सुतार, साक्षी सरनाईक, धैर्यशील जाधव, धनवंती माळरेकर, अखिलेश कणबरकर, वाहिद अत्तार, प्रणित सूर्यवंशी, संजना पाटील, सिद्धांत पाटील, आकांक्षा तामकर (स्पोर्ट शूज), अनुष्का गुरव, सर्जेराव पवार, सिद्धेश कांबळे, तन्वी कोळी (फिश टँक), श्रेयस लठ्ठे (तिरूपती सहल), शारदा जाधव, हर्षद डकरे, विदुला पवार, राजवीर मोहिते, रोहन चौगले, संयोगिता गिरी, अश्विन माने, अवधूत मालगावे, अरिता बागवान, रिया कराड (पुस्तके). (प्रतिनिधी)