उदगावमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST2021-09-14T04:28:23+5:302021-09-14T04:28:23+5:30
याबाबत अधिक माहिती अशी, नोमान शब्बीर सय्यद (वय ८) हा मुलगा देसाई विद्यामंदिराजवळील आपल्या घराशेजारी खेळत होता. अचानकच दोन ...

उदगावमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक जखमी
याबाबत अधिक माहिती अशी, नोमान शब्बीर सय्यद (वय ८) हा मुलगा देसाई विद्यामंदिराजवळील आपल्या घराशेजारी खेळत होता. अचानकच दोन मोकाट कुत्र्यांनी त्याच्या मानेवर चावा घेत जखमी केले. यावेळी शेजारीच असलेले तोशीफ नदाफ, तसेच ग्रामस्थांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, त्या कुत्र्याने मानेला चावा घेतल्याने त्या मुलास सांगली सिव्हिल रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. सध्या गावामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. रात्री, पहाटे सांगली येथून कुत्रे आणून सोडण्यात येत असल्याची चर्चा गावात सुरू आहे. गावातील तळा परिसर, तसेच कुंजवण परिसर, देसाई विद्यामंदिर, तसेच एसटी स्टँड परिसर व गाव वेशीबाहेर या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत असून ग्रामपंचायत प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.