आईवर खुनी हल्ला करणाऱ्या मुलास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:57+5:302021-08-20T04:29:57+5:30
शिरोळ : शेतजमिनीच्या वाटणीवरून मुलाने आईवर कुऱ्हाडीने खुनी हल्ला केल्याप्रकरणी मुलास अटक करून जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता तीन ...

आईवर खुनी हल्ला करणाऱ्या मुलास अटक
शिरोळ : शेतजमिनीच्या वाटणीवरून मुलाने आईवर कुऱ्हाडीने खुनी हल्ला केल्याप्रकरणी मुलास अटक करून जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विठ्ठल बाळकू धनगर (वय ३६, रा. न्यू इंग्लिश स्कूलसमोर, शिरोळ) असे त्याचे नाव आहे. या हल्ल्यात शेवंता बाळकू धनगर (वय ६०, रा. समतानगर) या जखमी झाल्या. सांगली शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी, शेवंता त्यांचा लहान मुलगा काशीनाथ व त्याची पत्नी सुजाता हे तिघे जण घरी बोलत बसले होते. यावेळी संशयित आरोपी विठ्ठल हा तेथे आला. शेतातील वाटणी मला का देत नाहीस, असे म्हणून त्याने आईला शिवीगाळ करीत कुऱ्हाडीने हल्ला केला. दोन वार केल्यामुळे यात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर संशयित स्वत: पोलिसांत हजर झाला. बुधवारी रात्री उशिरा काशीनाथ धनगर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.