शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

बालकलाकारांच्या अभिनयाला धुमारे

By admin | Updated: January 3, 2015 00:15 IST

राज्य बालनाट्य स्पर्धा : गोविंद गोडबोले यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर : जीवनाचा अर्थ कळण्यासाठी चांगल्या संस्कारांचे संचित किती गरजेचे आहे हे मांडणारा दोन फुले, स्त्रीशिक्षणाचा जागर करणारी सावित्रीची लेक, पुरोगामी विचारसरणीच्या मुलाने भ्रष्टाचाराला केलेला विरोध, शिक्षणासोबतच मूल्यांचे महत्त्व मांडणाऱ्या त्या चौघी... अशा विविधांगी विषयांवर भाष्य करीत बालकलाकारांनी राज्य नाट्यस्पर्धेचा पहिला दिवस गाजविला. यानिमित्ताने लहान मुलांच्या सामाजिक जाणिवा पालकांच्या जाणिवांपेक्षाही किती समृद्ध असतात, याचे प्रत्यंतर आले.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने १२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आज, शुक्रवारपासून प्रारंभ झाला. शाहू स्मारक भवनमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी भरत लांघी, रमेश हंकारे व ज्येष्ठ बालसाहित्यिक गोविंद गोडबोले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. परीक्षक मीनाक्षी वाघ, नविनी कुलकर्णी, वामन तावडे उपस्थित होते. सकाळी दहा वाजल्यापासून सादरीकरणसुरु झाले. दिवसभरात नॉट फॉर सेल (ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल (सांगली), दोन फुले (आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगाव), बीज अंकुरले (आजरा हायस्कूल), त्या चौघी (अण्णा भाऊ इंग्लिश स्कूल), सावित्रीची लेक (दामले विद्यालय), स्वातंत्र्य - एक प्रश्नचिन्ह (फाटक हायस्कूल, रत्नागिरी), ही नाटके सादर झाली. आज काळोखाच्या प्रकाशरेषा, कोल्हापुरी मिस ८, आम्ही नाटक करीत आहोत, आम्ही तुमचे सोबती, सांजसावल्या, आम्ही सात, क्रांतिसिंह ही नाटके सादर होणार आहेत. (प्रतिनिधी)पाच दिवसांत नाटक ठबाचणीतील एम. आर. पाटील विद्यालयाने ‘श्यामची आई’ या नाटकाचे सादरीकरण काही अडचणींमुळे रद्द केले. पण, विद्यार्थ्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून शाळेने पाचच दिवसांपूर्वी ‘रोगांचा दरबार’ नाटक बसविले. अवघ्या अर्ध्या तासाचे हे नाटक विद्यार्थ्यांनी दमदारपणे सादर केले. मुख्याध्यापिका अरुणा पाटील यांच्यासह शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेतला.