गडमुडशिंगीत चिकनगुण्यासदृश साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:39 IST2021-05-05T04:39:27+5:302021-05-05T04:39:27+5:30

गावातील आंबेडकर चौक, हुडा भाग, समर्थनगर, माळवाडी या भागात चिकनगुण्या झालेले रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्हा हिवताप निवारण पथकाने ...

Chikangunya-like accompaniment in Gadmudashingit | गडमुडशिंगीत चिकनगुण्यासदृश साथ

गडमुडशिंगीत चिकनगुण्यासदृश साथ

गावातील आंबेडकर चौक, हुडा भाग, समर्थनगर, माळवाडी या भागात चिकनगुण्या झालेले रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्हा हिवताप निवारण पथकाने सर्व्हे सुरू केला आहे. या पथकाने गावातील ३५० नागरिकांच्या घरी जाऊन साठवलेल्या पाण्याचे निरीक्षण केले. त्यामध्ये ३३ जणांच्या घरातील साठवलेल्या पाण्यामध्ये चिकनगुण्यासदृश डासांच्या अळ्या निदर्शनास आल्या. साठवलेल्या पाण्याचे हौद, बॅरेल यांना झाकणे आवश्यक असून नागरिकांनी खबरदारी म्हणून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिन म्हणून पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो : ०४ गडमुडशिंगी हिवताप निवारण

ओळ- गडमुडशिंगी (ता. करवीर) गावात चिकनगुण्यासदृश साथ आल्याने जिल्हा हिवताप निवारणाच्या पथकाने गावात ठिकठिकाणी सर्व्हे केला. यावेळी माजी सरपंच जितेंद्र यशवंत, हिवताप निवारण समितीचे एम. जी. वड्ड, व कर्मचारी वर्ग.

Web Title: Chikangunya-like accompaniment in Gadmudashingit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.