नगराध्यक्ष बदलाची कोंडी फुटेना

By Admin | Updated: May 25, 2015 00:37 IST2015-05-24T22:23:46+5:302015-05-25T00:37:21+5:30

गडहिंग्लज पालिका : शिंदे-गुरव यांच्यात ‘एकमत’ होत नाही; निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची कसोटी

The Chief of the Township Changki Kandi Futana | नगराध्यक्ष बदलाची कोंडी फुटेना

नगराध्यक्ष बदलाची कोंडी फुटेना

राम मगदूम- गडहिंग्लज -नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या ज्येष्ठ नगरसेविका अरुणा शिंदे व सरिता गुरव यांच्यात एकमत होत नसल्यामुळे गडहिंग्लज पालिकेच्या राजकारणात मोठीच कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष बदलण्याची कोंडी कशी फोडायची, असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचीच कसोटी लागली आहे.नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीचे नऊ, तर विरोधी जनतादल-जनसुराज्य-काँगे्रस आघाडीचे आठ नगरसेवक आहेत. काठावरील बहुमतामुळे नगराध्यक्ष निवडीसह विषय समित्यांच्या सभापती निवडीवेळी आतापर्यंत नेत्यांचीच कसोटी लागली. तशीच परिस्थिती आताही निर्माण झाली आहे.पहिल्या टप्प्यातील अडीच वर्षांसाठी खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित नगराध्यक्षपदी मंजूषा किरण कदम यांना संधी देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
दुसऱ्या टप्प्यात पहिल्यांदा लक्ष्मी बाळासाहेब घुगरे यांना संधी देण्यात आली. त्याचवेळी इच्छुक असलेल्या शिंदे व गुरव यांना उर्वरित कालावधीत दहा-दहा महिने संधी देण्याची ग्वाही देऊन तोडगा काढण्यात आला; परंतु पहिल्यांदा ‘आपण’च या भूमिकेवर दोघीही ठाम असल्यामुळेच ‘घोडे’ अडले आहे.
विद्यमान नगराध्यक्षा घुगरे यांनी आपली मुदत संपल्यामुळे नगराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे दिला आहे. शिंदे व गुरव यांच्यात एकमत झाल्यानंतरच त्यांचा राजीनामा मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, असे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले
आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन शिंदे व गुरव यांच्यात एकमत घडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघींनीही नेते मुश्रीफ सांगतील ते आपणास मान्य असेल, असे सांगितले आहे. मात्र, काही झाले तरी पहिली संधी आपल्यालाच मिळाली पाहिजे याच मुद्यावर दोघीही ठाम आहेत, असे समजते.


घुगरे यांना मुदतवाढ ?
अडीच वर्षांनंतर झालेल्या नगराध्यक्ष निवडीवेळी विरोधी आघाडीने केलेल्या सत्तांतराच्या मोेर्चेबांधणीमुळे बहुमत असूनही आमदार मुश्रीफ यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोठी दमछाक झाली. त्यावेळी दस्तुरखुद्द मुश्रीफ यांनी स्वत: लक्ष घालून विरोधकांची ‘खेळी’ उधळून लावल्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता वाचली. त्यामुळे यावेळी ‘धोका’ पत्करण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे शिंदे व गुरव यांच्यात एकमत न झालेस विद्यमान नगराध्यक्षा घुगरे यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: The Chief of the Township Changki Kandi Futana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.