मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST2021-07-30T04:27:39+5:302021-07-30T04:27:39+5:30
कोल्हापूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापुरात
कोल्हापूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात येत आहेत. सकाळी १० वाजता ते कोल्हापुरात येणार असून, सव्वा तीन वाजता पुन्हा मुंबईला रवाना होणार आहेत.
सकाळी १० वाजता कोल्हापूर विमानतळावर ठाकरे यांचे आगमन होईल. त्यानंतर ते तेथूनच शिरोळकडे रवाना होणार आहेत. तेथील पूरस्थितीची पाहणी करून ते ११ वाजून ५० मिनिटांनी शाहूपुरी सहाव्या गल्लीत नाईक ॲण्ड नाईक कंपनीजवळ येतील. सव्वा वाजता ते पंचगंगा रुग्णालय ते शिवाजी पूल रस्त्यादरम्यान बाधित भागाची पाहणी करतील. त्यानंतर दीड वाजता त्यांचे शासकीय विश्रामगृहावर आगमन होणार आहे. यानंतर या ठिकाणी पूरस्थितीचा ते आढावा घेणार असून, त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. सव्वा तीन वाजता ते मुंबईकडे विमानाने रवाना होणार आहेत.
चौकट
ठाकरे-फडणवीस कोल्हापुरात
कोल्हापुरातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकाचवेळी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत हे शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात येणार आहेत. मंत्र्यांच्या दौऱ्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.