निलेवाडीच्या ग्रामस्थांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:55+5:302021-07-30T04:25:55+5:30

नवे पारगाव : निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील महापूरग्रस्तांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी भेट घेतली. यावेळी ...

Chief Executive Officer's relief to the villagers of Nilewadi | निलेवाडीच्या ग्रामस्थांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा दिलासा

निलेवाडीच्या ग्रामस्थांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा दिलासा

नवे पारगाव : निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील महापूरग्रस्तांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेत त्यांना दिलासा दिला.

पुरामुळे गावच्या नळपाणी पुरवठा योजनेचे मोटर पंप, ग्रामपंचायत व प्राथमिक शाळेतील संगणक पाण्यात बुडाल्याने खराब झाले आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अधिक निधी दिला जाईल, अशी ग्वाही संजयसिंह चव्हाण यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई आळतेकर, माजी उपसभापती प्रदीप देशमुख, विनय कोरे, सहकार समूहाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब माने, सरपंच वर्षा माने, उपसरपंच तानाजी जाधव, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, विस्तार अधिकारी संतोष पवार, ग्रामविकास अधिकारी विजया बोराडे, तलाठी प्रधान भानसे, सर्जेराव बागडी, विजया खोत, वर्षा शिंदे उपस्थित होते.

फोटो ओळी : महापूरग्रस्त निलेवाडीतील ग्रामस्थांशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी बाबासाहेब माने, प्रदीप देशमुख व अन्य उपस्थित होते.

(छाया : दिलीप चरणे)

Web Title: Chief Executive Officer's relief to the villagers of Nilewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.