छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:29+5:302021-01-17T04:22:29+5:30
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४१ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ...

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन उत्साहात
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३४१ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
या सोहळ्यात क्षात्र पुरोहित रामदास पाटील यांनी सत्यशोधक पद्धतीने राज्याभिषेकाचे सर्व संस्कार केले. या सोहळ्यास करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, एस. टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक राेहन पलंगे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपअभियंता हर्षद घाटगे, वैधमापन निरीक्षक अरविंद महाजन, आश्विन वागळे, अजय शिंदे, अनिल पाटील, प्रशांत सासने, शाहीर राजू राऊत, शाहीर दिलीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी स्वागत केले.
फोटो : १६१२०२१-कोल-संभाजीराजे शिवराज्याभिषेक
ओळी : कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात संभाजी ब्रिगेडतर्फे संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी साजरा करण्यात आला.